Delilah Lobo : विकास आणि प्रगतीचे द्वार झाले खुले!

दिलायलांच्या भाजप प्रवेशाचे शिवोलीतून स्वागत
Delilah Lobo
Delilah LoboDainik Gomantak

शिवोली : कॉंग्रेसच्या बंडखोर आमदार दिलायला लोबो यांनी भाजपमध्ये प्रवेश करून शिवोलीच्या विकास आणि प्रगतीची द्वारे सर्वांसाठी खुली केली आहेत. या भागातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये आलेली मरगळ त्यांच्या भाजप प्रवेशामुळे दूर झाली असून पक्षाचे कार्यकर्ते नव्या दमाने कामाला लागतील, असे उत्तर गोवा जिल्हा पंचायतीचे माजी उपाध्यक्ष वासुदेव कोरगावकर यांनी ‘दै. गोमंतक’ला सांगितले.

Delilah Lobo
Goa Crime : गोव्यात वाढतोय ड्रग्जचा प्रसार! अमेरिकन ड्रग्स सप्लायरला अटक

शिवोलीवासीयांना भाजपवर मुळापासून प्रेम आणि आपुलकी होती; परंतु येथील काही मुजोर राजकारण्यांमुळे शिवोली मतदारसंघ भाजपपासून दुरावलेल्या होता. आमदार दिलायला लोबो यांच्या भाजप प्रवेशामुळे पक्षाचा तळागाळातील कार्यकर्ता तसेच शिवोलीतील पक्ष संघटना बळकट झाल्याचे कोरगावकर यांनी सांगितले.

गेल्या दोन वेळच्या विधानसभा निवडणुकीत योग्य उमेदवार न लाभल्याने भाजपवर पराभवाची नामुष्की ओढवली होती. परंतु आता दिलायला लोबो यांच्या रूपाने शिवोलीत भाजपला नवा चेहरा लाभला आहे. त्यामुळे शिवोली मतदारसंघात गेली अनेक वर्षे रखडून पडलेल्या विकासकामांना आता गती लाभणार आहे.

- हनुमंत नाईक (सरपंच, आसगाव पंचायत)

आमदार दिलायला लोबो आम्हाला कधीच परक्या वाटल्या नाहीत. भाजप प्रवेशामुळे त्यांना अधिक महत्त्व प्राप्त झालेले असून तमाम शिवोलकर एकजुटीने त्यांच्या पाठीशी उभे आहेत. भविष्यात भाजपचा विजयी रथ त्यांच्या रूपाने शिवोली पंचक्रोशीत चौफेर उधळणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे.

- शर्मिला वेर्णेकर (सरपंच, मार्ना-शिवोली)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com