मुख्यमंत्र्यानी आश्वासन दिल्याप्रमाणे गोव्याला खड्ड्येमुक्त करावे: खांडेकर

मुख्यमंत्र्यानी 1 नोव्हेंबर पर्यंत राज्यातील खड्डे बुजवणार असल्याचे दिलेल्या आश्‍वासनाला काँग्रेसचे प्रवक्ते खांडेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली प्रतिक्रिया दिली.
मुख्यमंत्र्यानी आश्वासन दिल्याप्रमाणे गोव्याला खड्ड्येमुक्त करावे: खांडेकर
Congress Spokesperson Mahadeo KhandekarDainik Gomantak

पणजी: भारतीय जनता पक्षाच्या सरकारने (BJP Govt) गेली अनेक वर्षे गोवेकरांना फक्त आश्‍वासनेच दिलीत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (CM Dr Sawant) यांनी विरोधी पक्षाने राज्यातील खड्ड्यांचा विषय हाती घेतल्याबद्दल विरोधी पक्षाला दुषणे न देता 1 नोव्हेंबर पर्यंत राज्यातील खड्डे बुजवण्याचे (pothole free road) जे काल आश्‍वासन दिले आहे ते पूर्ण करावे न पेक्षा कॉंग्रेस (GPCC) पुन्हा आंदोलन करील, असा इशारा कॉंग्रेसने दिला आहे. पणजी येथे आज कॉंग्रेस कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत प्रवक्ते महादेव खांडेकर (Congress Spokesperson Mahadeo Khandekar) यांनी वरील इशारा दिला. यावेळी युवा कॉंग्रेसचे पदाधिकारी ॲड. अर्चीत नाईक, ॲड. गौतम भगत, साईश अस्नोडकर व यश कोसरेकर उपस्थित होते.

Congress Spokesperson Mahadeo Khandekar
गालजीबाग नदीची खाडी बदलतेय आपली भौगोलिक रचना

पेडणे ते काणकोणपर्यंत रस्ते खड्डेमय झालेत. खुद्द भाजपचे उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी याबाबत नाराजी व्यक्त करुन कंत्राटदारावर टीका केल आहे. मात्र कॉंग्रेसचे विरोधीपक्षनेते दिगंबर कामत यांनी खड्डे विरोधी आंदोलनात सेल्फी काढली म्हणून मुख्यमंत्र्याना राग आला. हे योग्य नसल्याचे सांगून मुख्यमंत्र्यानी दिलेले आश्‍वासन पाळून गोव्यातील लोकाना खड्ड्यापासून मुक्ती द्यावी. असे खांडेकर म्हणाले. भाजपच्या राज्यात भ्रष्टाचार वाढलेला असल्याने नव्या रस्त्यांना, उड्डाणपुलांना भेगा पडतात व संरक्षण भिंती कोसळत आहेत. अशी टीका करुन मुख्यमंत्र्यानी काल कॉंग्रेस काळात सरकारी तिजोरी भरुन वाहत होती, असे जे म्हटले ते खरेच आहे. कारण कॉंग्रेस सरकार योग्य नियोजन करुन कामे करत होती. मात्र भाजप सरकारच्या काळात कुणाच्या तरी खिशात कमीशन जाण्यासाठी कामे केली जातात, असा आरोप खांडेकर यांनी केला व गोव्याचे कर्ज 6700 हजार कोटीवरुन 2126 हजार कोटीवर पोचल्याचा दावा केला.

Congress Spokesperson Mahadeo Khandekar
समुद्र किनाऱ्यावर गाडी चालविल्याच्या आरोपातून मिकी पाशेको निर्दोष मुक्त

कसिनो मुदतवाढ कशासाठी?

कॉंग्रेसने कसिनो आणलेत, भाजपचे सरकार आल्यानंतर ते हटवणार, असे सांगून भाजप सत्तेवर आला. मात्र गेली 10 वर्षे कसिनोना मुदतवाढ दिली जात आहे. यावेळी तर सहा महिन्याएवजी वर्षभर मुदतवाढ दिवली गेलीय. हे कुणाच्या फायद्यासाठी ते सरकारने स्पष्ट करावे. अशी मागणी खांडेकर यांनी यावेळी केली. कसिनोचालकांनी कॉंग्रेसच्या नेत्यांची लग्ने केली नाहीत! असा टोला यावेळी खांडेकर यांनी मारला. तर मग भाजपच्या नेत्यांच्या मुलांची लग्ने केली का? या पत्रकारांच्या प्रश्‍नाला त्यांनी उत्तर देण्याचे टाळले.

Related Stories

No stories found.