Motocross Accident in Goa : म्हापशातील मोटोक्रॉस मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करा; काँग्रेस आक्रमक

शेतजमिनीत मातीचा भराव टाकून स्पर्धा भरवण्यास परवानगी दिली कोणी? काँग्रेसचे प्रवक्ते संजय बर्डेंचा सवाल
Motocross Accident in Mapusa
Motocross Accident in Mapusa Dainik Gomantak

Motocross Accident in Goa : म्हापसा येथे आयोजित एमआरएफ मोटोग्रीप सुपरक्रॉस अ‍ॅक्शन चॅम्पियनशीप स्पर्धेत एका 20 वर्षीय रायडरचा दुर्दैवी मृत्यू झाला. मात्र, ज्याठिकाणी ही स्पर्धा भरवली होती ती जागा योग्य होती का? मुळात शेतात मातीचा भराव टाकून ही स्पर्धा भरवण्यासाठी परवानगी कोणी दिली. या संपूर्ण प्रकरणाची पोलीस चौकशी करुन दोषींवर गुन्हा नोंदवा, अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते संजय बर्डेंनी केली आहे.

संजय बर्डे म्हणाले की, मुळात शेतजमिनीत कुणीही माती टाकल्यास भरारी पथक किंवा प्रशासकीय यंत्रणा कारवाई करते. मात्र, इथे कायद्याची पायमल्ली करुन शेतात स्पर्धा भरवली जाते. या स्पर्धेत एका युवकाचा जीव गेला असून, आम्हाला राजकारण करायचे नाही. मात्र, शेतात अशाप्रकारचा चित्तथरारक स्पर्धा भरवण्यास कशी परवानगी मिळू शकते? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

मुळात मैदानांवरच सुरक्षा मानदंडाचे पालन करुन स्पर्धा भरवण्याची गरज असते. परंतु, अशाप्रकारे शेतात स्पर्धा भरवणे अयोग्य. या स्पर्धेस कुठल्या प्रशासकीय यंत्रणांनी परवानगी दिल्या. आणि जे कृत्रिम रेस ट्रॅक बनविले होते, ते सुरक्षेच्या दृष्टिकोनातून योग्य होते का? याची कुणी तपासली केली? असे प्रश्न उपस्थित करत अशा घटनांमुळे गोव्याची नाहक बदनामी होत असल्याचं बर्डेंनी म्हटलं आहे.

Motocross Accident in Mapusa
Vishwajit Rane: इको सेन्‍सेटिव्हमधून 99 गावे वगळा; वनमंत्री विश्वजीत राणे यांची मागणी

बर्डे पुढे म्हणाले की, मुळात शेतात माती टाकण्यास म्हापसा पालिका परवानगी कशी देऊ शकते? मुळात पालिकेचे काम हे लोकांना मूलभूत सुविधा पुरविण्याचे असते, अशाप्रकारे शेतजमिनीत बेकायदेशीरपणे खेळ भरविणे नाही. पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत चौकशी करावी आणि कुणाच्या बेजबाबदारपणामुळे मडगावमधील युवकाचा जीव गेला, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी बर्डेंनी यावेळी केली.

काँग्रेसने घेतलेल्या या पत्रकार परिषदेत अ‍ॅड. शंशाक नार्वेकर यांनीही स्पर्धेच्या आयोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. मुळात पालिका शेतात फक्त पंडाल उभारून प्रदर्शन भरविण्यास परवानगी देते. मात्र, हा इव्हेंट तशाप्रकारचा नव्हता. या स्पर्धेस उपजिल्हाधिकारी कार्यालयाकडून खरोखर परवानगी मिळाली होती आणि पालिकेने आयोजकांचे सर्व एनओसी तपासूनच त्यांना परवानगी दिली होती का? हे तपासावे लागेल. जर स्पर्धा आयोजनासाठी कायदेशीर परवाने नव्हते, तर पोलिसांनी ही स्पर्धा थांबवली का नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

ज्यावेळी कायद्याचे पालन न करताच इव्हेंटला परवानगी मिळते, तेव्हा असे परिणाम भोगावे लागतात. या स्पर्धेच्या ठिकाणी पालिकेचे अधिकारी व लोकप्रतिनिधी हे उपस्थित होते. ही खेदाची बाब असल्याचंही अ‍ॅड. नार्वेकर म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com