माजी पोलिस महासंचालकांच्या मृत्यूची चौकशीची काँग्रेसकडून मागणी

Congress demands probe into former DGP's death
Congress demands probe into former DGP's death

पणजी: राज्यातील भाजप सरकारने गोव्याचे ड्रग्ज केंद्र म्हणून परिवर्तन केल्यानेच प्रत्येक ड्रग्ज प्रकरणाचा संबंध गोव्याशी जोडला जात आहे. भाजप नेते व ड्रग्ज माफिया लागेबांधेसंदर्भातचे धागेदोरे तपासण्यासाठी माजी पोलिस महासंचालक प्रणब नंदा यांनी सुरू केल्यानंतर त्यांचे अकाली निधन झाले होते. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी होण्याची गरज असल्याची मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केली आहे. 

गेल्या वर्षी नोव्हेंबरात दिल्लीत गेले असताना, माजी पोलिस महासंचालक प्रणब नंदा यांना ह्रदय विकाराचा तीव्र झटका येऊन त्यांचे निधन झाले होते. ते एक कर्तबगार पोलिस अधिकारी होते व गोव्यातील अमलीपदार्थ व्यवहारांची चौकशी करीत होते. ते आरोग्याने तंदुरूस्त होते त्यामुळे एखादा मानसिक दबाव असल्याखेरीज त्यांना ह्रदयविकाराचा झटका येणे अशक्यप्राय होते असा दावा गिरीश चोडणकर यांनी केला आहे. 

प्रणब नंदा हे भाजपच्या पदाधिकारी व नेत्यांचे समर्थन लाभलेल्या एका पोलिस अधिकाऱ्याकडून एका निष्पाप व्यापाऱ्याकडे ड्रग्ज प्रकरणांत गोवण्याची धमकी देऊन, लाखो रुपये खंडणी मागण्याच्या प्रकरणाची चौकशी करीत होते व एका पोलिस अधिकाऱ्याला निलंबित करण्याचा आदेश काढण्यापर्यंत त्यांची चौकशी पूर्ण झाली होती. नेमके याच कारणासाठी व सदर पोलिस अधिकारी निलंबित झाल्यास आपल्या पदाधिकारी व माजी आमदाराचे बिंग फुटणार या भयाने भाजपकडून त्यांच्यावर दबाव वाढत होता असे गिरीश चोडणकर यांनी दावा केला आहे.  

एखाद्या भाजप मंत्र्यांचा ड्रग्ज व्यवहारात गुंतलेले आपले नेते व पदाधिकारी यांना वाचवण्यासाठी स्व. नंदा यांच्यावर दबाव होता का याची सखोल चौकशी होणे महत्वाचे आहे. नंदा यांच्यांशी संपर्कात आलेल्यांची तपासणी करणे गरजेचे आहे, अशी मागणी चोडणकर यांनी केली आहे. 

सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यु प्रकरणात आता ड्रग्ज व्यवहाराचा सबंध लावला जात असल्याने, स्व. सुशांतचे मित्र तथा पंतप्रधानमंत्र्यांच्या जीवनावर चित्रपट निर्मिती केलेले संदिप सिंग यांची चौकशी होणे गरजेचे आहे. हा संदिप सिंग व भाजप नेत्यांचे नेमके कसले सबंध होते हे जनतेला कळणे गरजेचे आहे. गोव्यात मंत्री मायकल लोबो हे अनेकदा ड्रग्स व्यवहारात असलेल्या लोकांची त्यांना माहिती असल्याचा दावा करतात. मंत्री लोबो तसेच कार्यकर्त्याच्या फॅक्टरीत सापडलेले १०० किलो कॅटामायन ड्रग्स याची चौकशी केल्यास भाजपचे ड्रग्ज माफीया व व्यवहारात असलेले संबंध उघड होतील, असा आरोप गिरीश चोडणकर यांनी केला आहे.

संपादन: ओंकार जोशी

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com