'नोव्हेंबर अखेरपर्यंत काँग्रेसचा निवडणूक जाहीरनामा होणार घोषित'

अशी माहिती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तसेच पक्षाच्या निवडणूक जाहीरनामा समितीचे अध्यक्ष रमाकांत खलप (Ramakant Khalap) यांनी पत्रकारांना दिली.
'नोव्हेंबर अखेरपर्यंत काँग्रेसचा निवडणूक जाहीरनामा होणार घोषित'
CongressDainik Gomantak

पणजी: राज्यात (Goa) काँग्रेसने (Congress) प्रचाराची जय्यत तयारी करण्याबरोबरच लोकांपर्यंत पोहचून त्यांची मते व समस्या जाणून घेण्याचे अभियान सुरू केले आहे. येत्या 14 ऑक्टोबरला मडगावमध्ये (Margao) लोकांबरोबर खुली चर्चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. अशाप्रकारे दहा ठिकाणी चर्चा कार्यक्रमानंतर पक्षाचा निवडणूक जाहीरनामा येत्या नोव्हेंबर अखेरीपर्यंत घोषित करण्याचा प्रयत्न आहे अशी माहिती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तसेच पक्षाच्या निवडणूक जाहीरनामा समितीचे अध्यक्ष रमाकांत खलप (Ramakant Khalap) यांनी पत्रकारांना दिली.

भाजप सरकारला कंटाळलेली जनता पुन्हा काँग्रेसकडे वळत आहे. लोकांच्या समस्या तसेच मते जाणून घेण्यासाठी 14 ऑक्टोबरला मडगावात खुली चर्चा कार्यक्रम होणार असून यामध्ये मडगाव तसेच सालसेत तालुक्यातील लोकांना त्यात सामावून घेतले जाणार आहे. लोकांबरोबरच्या अशा या सभा राज्यातील विविध भागात घेतल्या जाणार असून 1`0 ठिकाणे निश्‍चित करण्यात आली आहेत. या कार्यक्रमादरम्यान विविध घटक क्षेत्राशी त्यामध्ये टॅक्सी, पर्यटन उद्योगातील व्यक्ती, लघु उद्योजक तसेच सीआयआय, गोवा चेंबर ऑफ कॉमर्स, शिक्षक व प्राध्यापक तसेच विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेतल्या जाणार आहेत असे खलप म्हणाले.

Congress
Goa Election: काँग्रेस-तृणमूलमध्ये वादाची ठिणगी, युतीची शक्यता धूसर

या लोकांबरोबरच्‍या खुली चर्चेवेळी लोकांना भविष्यात काय पाहिजे या त्यातील मुख्य मुद्दा असेल. लोकांची मते तसेच समस्या याची माहिती संकलित केली जाईल. सध्या राज्य आर्थिक संकटात असल्याने त्याची पूर्तता कशी करणार हा मोठा प्रश्‍न आहे. महसुलाची स्थिती खूपच वाईट आहे. काँग्रेस पक्ष या खुली चर्चेमधून मिळणारी माहिती ऑक्टोबर अखेरीपर्यंत जमा करून त्याचा निवडणूक जाहीरनाम्यात उल्लेख केला जाईल. जाहीरनामा तयार करण्याची प्रक्रिया नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत पूर्ण होईल. पक्षाच्या केंद्रीय समितीकडून त्याला संमती मिळाल्यावर नोव्हेंबरअखेरीपर्यंत तो लोकांसमोर जाहीर केला जाईल असे खलप यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.