गोव्यात पाय ठेवताच दिनेश गुंडू राव यांची भाजप सरकारवर टीका

गोव्यात पाय ठेवताच दिनेश गुंडू राव यांची भाजप सरकारवर टीका
dinesh gundu rao.jpg

काँग्रेसचे गोवा राज्य प्रभारी दिनेश गुंडू राव यांनी विमानतळावर पाय ठेवल्या ठेवल्या भाजप सरकारवर टीका करणे सुरू केले आहे. चार दिवसांच्या गोवा दौर्‍यावर आलेल्या राव यांनी गोव्यातील भाजप सरकारने चुकीच्या पद्धतीने कोविड व्यवस्थापन केल्यामुळे अर्थव्यवस्था कोलमडली आणि बेरोजगारी वाढल्याचे म्हटले आहे.(Congress Goa state in-charge Dinesh Gundu Rao has criticized the BJP government)

विमानतळावर त्यांचे विरोधी पक्षनेते दिगंबर कामत आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी स्वागत केले. तेथून पणजी मुख्यालयातील पदाधिकार्‍यांच्या बैठकीसाठी निघताना राव म्हणाले, भाजप सरकारने गोव्या समोर अनेक संकटे उभी केली आहेत. कोविड काळात सरकारने चुकीच्या पद्धतीने हाताळणी केल्यामुळे लोकांचा रोजगार बुडाला आहे. गोव्याची अर्थव्यवस्था पुरती कोलमडून गेली आहे. आता जनतेनेच येत्या निवडणुकीत भाजप सरकार घालवून राज्य वाचवले पाहिजे.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com