'चर्चिल आलेमाव वाळूच्या ढिगाऱ्यांवरुन लोकांची दिशाभूल करतायेत'

आमदार चर्चिल आलेमाव (Churchill Alemao) शॅक मालक आणि मच्छीमारांमध्ये भीती निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप काँग्रेस नेत्यांनी केला आहे.
'चर्चिल आलेमाव वाळूच्या ढिगाऱ्यांवरुन लोकांची दिशाभूल करतायेत'

Churchill Alemao

Dainik Gomantak 

पणजी: किनारी क्षेत्र व्यवस्थापन आराखडा (CZMP) मसुद्यावर वाळूचे ढिगारे दाखवल्यास ते राज्यातील पर्यटनासाठी त्रासदायक ठरेल असे म्हणणारे टीएमसीचे नेते आणि बाणावलीचे आमदार चर्चिल आलेमाव (Churchill Alemao) शॅक मालक आणि मच्छीमारांमध्ये भीती निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप काँग्रेस नेत्यांनी केला आहे.

"सीझेडएमपी मसुद्यावर जर वाळूचे ढिगारे दाखवले नाही तर गोमंतकीय, गोव्याच्यी किनारपट्टीची ओळख आणि व्यवसाय गमावून बसणार." असे मत काँग्रेस (Congress Goa) नेत्यांनी व्यक्त केले आहे. गोवा प्रदेश काँग्रेस समितीची सरचिटणीस आर्किटेक्ट रॉयला फर्नांडिस यांनी प्रवक्ते ओलेन्सिओ सिमोयस आणि देवसुरभी यदुवंशी यांच्या सोबत पणजी येथे पत्रकार परिषद घेवून आलेमाव स्वत:चे निष्कर्ष लोकांवर लादण्याचा प्रयत्न करत असल्याचे म्हटले.

<div class="paragraphs"><p>Churchill Alemao</p></div>
'सुडबुद्धीने वागणार्‍या भाजपला नाकारा'

आलेमाव यांनी या प्रकरणावर सीआरझेड अधिकार्‍यांना दोष दिला होता आणि म्हटले होते की ते गोव्याचे नसल्याने त्यांना राज्य आणि किनारपट्टी विषयी माहिती नाही. "चर्चिल आलेमाव किनारी भागातील जनतेची दिशाभूल करून राजकीय फायदा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. मतांचे विभाजन करण्याची त्यांची इच्छा प्रत्यक्षात येणार नाही." असे रॉयला फर्नांडिस म्हणाल्या.

चर्चिल आलेमाव यांनी शॅक मालक आणि मच्छीमार समुदाया मध्ये भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. पण काँग्रेस जनतेसमोर सत्य आणत आहे.’’ असे ती म्हणाली. समुद्र किनाऱ्या शिवाय गोव्याची ओळख काय आहे." असा प्रश्न फेर्नांडीस यांनी केला.

ओलेन्सिओ सिमोयस म्हणाले की वाळूचे ढिगारे किनारपट्टीचे संरक्षण करतात. ‘‘मजबूत लाट, उंच लाटा आणि किनारी पुरापासून वाळूचे ढिगारे किनारपट्टीचे संरक्षण करतात.’’ असे ते म्हणाले. किनारी भाग प्रभावित झाल्यास पर्यटनावरही परिणाम होईल, असे ते म्हणाले. "आम्ही आमची पारंपारिक उपजीविका गमावू देणार नाही." असे ते म्हणाले.

ते म्हणाले की, मच्छीमार समाजाच्या हितासाठी बंदराची मर्यादा काढून टाकावी आणि वाळूच्या ढिगाऱ्यांचे सीमांकन करण्यात यावे. "जर सरकारने हे केले नाही तर आम्ही न्याय मिळवण्यासाठी आमचे आंदोलन तीव्र करू." असे ते म्हणाले.

<div class="paragraphs"><p>Churchill Alemao</p></div>
एकाच महिन्यात पदाधिकाऱ्याचा भाजपला 'रामराम'

देवसुरभि यांनी सांगितले की चर्चिल आलेमाव गोव्यात अदानीसाठी मागील दाराने प्रवेश करण्याचा मार्ग तयार करत आहेत आणि असे करून शॅक मालक आणि मच्छीमारांचे जीवनमान उद्ध्वस्त करत आहेत.

“आम्ही आलेमाव आणि टीएमसीला गोव्याच्या किनारपट्टीचा नाश करू देणार नाही. काँग्रेस शाश्वत विकासासाठी आहे आणि उपजीविकेचे संरक्षण आणि रक्षण करेल. आम्ही गोव्याच्या अनोख्या वारशाचे रक्षण करू.” असे ती म्हणाली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com