
Amit Patkar: राज्य आणि केंद्रातले भाजप सरकार हे भ्रष्ट आनी जुमला सरकार आहे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी केली. काँग्रेसच्या 'हाथ से हाथ जोडो' अभियानाच्या प्रारंभप्रसंगी ते बोलत होते.
सकाळी श्री भगवती देवीचे दर्शन घेऊन पेडणे मतदारसंघात हाथ से हाथ जोडो या मोहिमेला प्रारंभ करण्यात आला. यावेळी उत्तर गोव्याचे काँग्रेस सरचिटणीस जितेंद्र गावकर, प्रवक्ता संजय बर्डे, उत्तर गोवा अध्यक्ष विरेंद्र शिरोडकर आदी उपस्थित होते.
भाजप सरकारला आता घरी पाठवण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे, असेही पाटकर म्हणाले. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी जनतेसाठी दिलेल्या संदेशाची पत्रकेही यावेळी वितरीत करण्यात आली.
दरम्यान, काँग्रेसचे म्हादयीबाबतचे अभियान पुर्ण करणार आहे. म्हादई वाचविण्यासाठ सत्तरीत रॅली काढणार असल्याची माहिती विजय भिके यांनी दिली.
गोव्यात यापुर्वीच विविध ठिकाणी काँग्रेसच्या या अभियानाला सुरवात झाली आहे. पुढील वर्षी देशात लोकसभा निवडणूक होणार आहे. त्या पार्श्वभुमीवर काँग्रेसने भारत जोडो यात्रेनंतर हाथ सो हाथ जोडो अभियान सुरू केले आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.