"मुख्यमंत्री प्रमोद सावंतांकडून आचारसंहितेचा भंग"

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 26 फेब्रुवारी 2021

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दक्षिण गोवा जिल्हा भाजप कार्यालयात सरकारी अधिकाऱ्यांना बोलावून घेतलेल्या जनता दरबाराने नगरपालिका निवडणूक आचारसंहितेचा भंग केला आहे.

मडगाव: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दक्षिण गोवा जिल्हा भाजप कार्यालयात सरकारी अधिकाऱ्यांना बोलावून घेतलेल्या जनता दरबाराने नगरपालिका निवडणूक आचारसंहितेचा भंग केला आहे.

भाजप सरकारने जिल्हा पंचायत निवडणुकानंतर आजपर्यंत किती गोमंतकीय युवकांना सरकारी नोकरी दिली, ते मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावे अशी मागणी मडगाव गट कॉंग्रेस समिती अध्यक्ष गोपाळ नाईक यांनी केली आहे. मडगावात बुधवारी भाजप कार्यालयात मुख्यमंत्र्यांनी घेतलेला जनता दरबार तसेच दहा हजार नोकऱ्या देण्याची केलेली घोषणा यावर नाईक यांनी टिका केली. अधिकृतपणे मुख्यमंत्र्यांची वेळ मागून घेतलेल्या अनेकांना मुख्यमंत्री ऐनवेळी भाजप कार्यालयात कसे काय बोलावू शकतात, असा प्रश्न नाईक यांनी उपस्थित केला आहे.

गोव्यात कळंगुटच्या हॉटेलमधील वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश 

मुख्यमंत्र्यांनी सत्तेचा वापर करून सरकारी अधिकाऱ्यांना जबरदस्तीने भाजप कार्यालयात हजर राहण्याची सक्ती केली. निवडणूक आचारसंहितेमुळे जनता दरबाराची जागा दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयातुन भाजप कार्यालयात हलविली, असे स्पष्टीकरण देणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी प्रशासकिय कारभाराच्या अज्ञानाचे प्रदर्शन केले आहे, असा आरोपही नाईक यांनी केला आहे.

गोवा पंचायत सचिव पदासाठीची परीक्षा पालिका निवडणूक आचारसंहितेमुळे पुढे ढकलली 

संबंधित बातम्या