काँग्रेस नेते पी. चिदंबरम पिळगावात कार्यकर्त्यांशी साधणार संवाद

मये मतदारसंघातील वरगाव-पिळगाव येथील श्री चामुंडेश्वरी सभागृहात दुपारी 3.30 वा. आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत पी. चिदंबरम कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकीसंदर्भात मार्गदर्शन करणार आहेत.
काँग्रेस नेते पी. चिदंबरम पिळगावात कार्यकर्त्यांशी साधणार संवाद
Congress WorkersDainik Gomantak

डिचोली: आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे मुख्य निवडणूक निरीक्षक पी. चिदंबरम (P. Chidambaram) हे येत्या बुधवारी रोजी मये मतदारसंघातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. मये मतदारसंघातील वरगाव-पिळगाव येथील श्री चामुंडेश्वरी सभागृहात दुपारी 3.30 वा. आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत पी. चिदंबरम कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकीसंदर्भात मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष गिरीष चोडणकर, विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत आदी नेते उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती काँग्रेसचे संभाव्य उमेदवार ऍड. अजय प्रभूगावकर आणि मये गट काँग्रेसचे अध्यक्ष राजेश गावकर यांनी सोमवारी डिचोलीत पत्रकार परिषदेत दिली.

Congress Workers
Goa Election 2022: प्रियोळ मतदारसंघात होणार चुरशीची लढत

युवकांकडून प्रतिसाद

मये मतदारसंघातील काँग्रेसचे संघटन कार्य जोरात सुरु असून, कार्यकर्ते पक्षाच्या विजयासाठी कार्यरत झाले आहेत. गट समितीतर्फे मतदारसंघातील विविध भागात बैठकाही घेवून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात येते. सदस्य नोंदणीला विशेष करून युवकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. अशी माहिती ऍड. प्रभूगावकर आणि राजेश गावकर यांनी दिली. जास्तीत जास्त युवकांनी काँग्रेस पक्षाकडे आकर्षित व्हावे. असे आवाहन मये गट युथ काँग्रेसचे अध्यक्ष ऍड. गौतम शिरोडकर यांनी केले. तर मरगळ दूर करून कार्यकर्ते कामाला लागले आहेत. असे संदीप माईणकर म्हणाले. यावेळी विनोद धुरी आणि श्याम फातर्पेकर उपस्थित होते.

Related Stories

No stories found.