काँग्रेस नेते म्हापशात जनतेशी संवाद साधणार

काँग्रेस नेते पी. चिदंबरम, जयराम रमेश मंगळवारी म्हापशातील जनतेच्या भेटीला
काँग्रेस नेते म्हापशात जनतेशी संवाद साधणार

Congress

Dainik Gomantak

म्हापसा : माजी केंद्रीय वित्तमंत्री तथा काँग्रेसचे गोवा राज्य प्रभारी पी. चिदंबरम, तसेच माजी केंद्रीय पर्यावरणमंत्री जयराम रमेश मंगळवारी 4 रोजी म्हापसा येथील बोडगेश्वर मंदिराच्या सभागृहात स्थानिक लोक आणि स्वयंसेवी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांशी सुसंवाद साधणार आहेत. पर्यावरण, बेरोजगारी, आरोग्य आणि इतर विषयांवर ते चर्चा करतील.

<div class="paragraphs"><p>Congress</p></div>
'भाजपचे आपण काय वाईट केले'

यासंदर्भात गोवा राज्य काँग्रेसतर्फे (Congress) एक प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आले आहे. ज्यातम्हटले आहे, की गोव्यातील लोकांच्या समस्या समजून घेण्यासाठी आणि त्यावर योग्य तोडगा काढण्यासाठी पी. चिदंबरम (P. Chidambaram) यांनी विविध स्वयंसेवी संस्था, सामाजिक संस्था, टॅक्सीचालक यांच्यासह स्थानिकांशी संवाद साधण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्या अनुषंगाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

<div class="paragraphs"><p>Congress</p></div>
'नाईट कर्फ्यू' निर्णयाबाबत अजूनही टांगती तलवार..

गोव्यातील (Goa) विविध मतदारसंघांत होत असलेल्या त्यांच्या दौऱ्यांच्या दरम्यान अनेक लोकांनी त्यांना आत्मियतेने भेटवस्तू दिल्या. तसेच वैयक्तिक भेटी घेऊन समस्याही मांडल्या होत्या. त्यामुळे, गोवा राज्य आणि येथील लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी त्यांना व्यापकतेने थेट संवाद साधायचा होता, असेही काँग्रेस पक्षाने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com