Carlos Ferreira : भाजपकडून देशामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न!

कार्लुस फेरेरा : म्हापशात काँग्रेसतर्फे ‘हात से हात जोडो’ अभियान
MLA Carlos Ferreira
MLA Carlos FerreiraDainik Gomantak

Carlos Ferreira : भाजप सरकार सत्तेवर आल्यापासून महागाई, बेरोजगारी, जाती-धर्मात तेढ निर्माण करण्याचे प्रकार वाढलेत. सरकारी आस्थापने विकणे, उद्योगपतींना गोंजारणे, सर्वसामान्यांना वेठीस धरणे हे प्रकार सर्रास सुरू आहेत.

‘अच्छे दिन’च्या नावाने भाजपने लोकांचे सुख हिरावून घेतले. भाजपचे नेते सध्या विरोधकांत नव्हे, तर देशात फूट पाडण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप हळदोणेचे आमदार अ‍ॅड. कार्लुस फेरेरा यांनी केला.

MLA Carlos Ferreira
Goa Shigmotsav 2023: पणजीत घुमला 'ओस्सय, ओस्सय...' आणि 'घणचे कटर घण'चा निनाद...

शनिवारी (ता.11) म्हापशात काँग्रेसतर्फे ‘हात से हात जोडो’ अभियानावेळी ते बोलत होते. यावेळी उत्तर गोवा जिल्हाध्यक्ष वीरेंद्र शिरोडकर, शंभू भाऊ बांदेकर, गुरुदास नाटेकर, संजय बर्डे, विजय भिके, जॉन नाझारेथ, नगरसेवक सुधीर कांदोळकर, अ‍ॅड. शशांक नार्वेकर, नौशाद चौधरी, प्रतीक्षा खलप आदी उपस्थित होते.

सार्दिनना केले जातेय लक्ष्य
दिव्यांग लाभार्थी अपमानास्पद वागणूक विषयावर जोपर्यंत सार्दिन यांची बाजू ऐकत नाही, तोपर्यंत मला यावर भाष्य करता येणार नाही. लोकसभा निवडणूक जवळ आली असल्याने विरोधकांकडून त्यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न होत असावा, असेही फेरेरा म्हणाले.

MLA Carlos Ferreira
Goa Forest Fire : म्हादई अभयारण्यातील आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्राकडून मदत : विश्वजित राणे

म्हादईप्रश्‍नी न्यायालयात जाणार

अ‍ॅड. फेरेरा म्हणाले की, गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपची मतदान टक्केवारी घटली होती. मात्र, विरोधक विभागल्याने भाजपने सरकार स्थापन केले. काही नेते निवडणुकीपूर्वी भाजप नेत्यांवर टीका करायचे.

मात्र, आज तेच नेते भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये न्हाऊन स्वच्छ झालेत, अशी टीका त्यांनी केली. म्हादईप्रश्‍नी काँग्रेसतर्फे तीव्र लढा उभारला जाणार असून न्यायालयाचीही मदत घेणार असल्याचे ते म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com