Goa Congress MLA| काँग्रेस आमदार सज्ज; मात्र 'या' कारणामुळे लांबणार भाजपप्रवेश

गोव्यात राजकीय भूकंप काँग्रेसचे 11 पैकी 8 आमदार भाजप दाखल होणार, पक्ष विलीनीकरणासाठी प्रयत्न सुरू
Goa Congress MLA
Goa Congress MLADainik Gomantak

पणजी: गोव्यात राजकीय भूकंप काँग्रेसचे 11 पैकी 8 आमदार भाजप दाखल होणार, पक्ष विलीनीकरणासाठी प्रयत्न सुरू, काँग्रेसचे विरोधी पक्षनेते मायकल लोबो यांनी आज आपल्या दोन तृतीयांश आठ आमदारांची विधिमंडळ पक्षाची बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या समवेत चर्चा केली.

(Congress MLA ready But due to this reason, BJP entry will be delayed in goa)

Goa Congress MLA
Goa Congress Rebel : काँग्रेस आमदारांचा गट विलीनीकरणासाठी सज्ज; मुख्यमंत्र्यांसोबत बैठक

आज सभापती रमेश तवडकर राज्यात नाहीत त्यांचा दिल्ली दौरा सुरू आहे. त्यामुळे सध्याच्या घडीला हे विलीनीकरण लांबले असुन, हे आमदार भाजपात जाणार हे स्पष्ट झाले आहे. कारण गेल्या अनेक दिवसांपासून हे फुटीचे चर्चा सुरू असून या गटाला दोन तृतीयांश म्हणजे आठ आमदार मिळत नव्हते आज अखेर संकल्प अमोणकर, आलेक्स सिक्वेरा आणि रुडाल्फ फर्नांडिस मिळाल्याने यांचा आठ चा गट तयार झाला असून संपूर्ण काँग्रेस पक्ष भाजपमध्ये विलीन करण्याचा हा प्रस्ताव आहे. यात हे

  • मायकल लोबो,

  • दिगंबर कामत,

  • केदार नाईक,

  • राजेश फळदेसाई ,

  • डिलायला लोबो,

  • आलेक्स सिक्वेरा,

  • रुडाल्फ फर्नांडिस,

  • संकल्प आमोणकर

हे काँग्रेस आमदार सहभागी आहेत.तर युरी आलेमाव, एल्टन डिकास्टा ,कारलुस फेरेरा हे आमदार या ग्रुपपासून अलिप्त आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com