इंधन दरवाढीविरुद्धचे काँग्रेसचे आता गाव पातळीवर आंदोलन

dainik Gomantak
बुधवार, 1 जुलै 2020

पेट्रोल आणि डिझेल दरवाढीविरुद्ध गोव्यात काँग्रेसने सुरू केलेले आंदोलन गाव व तालुका पातळीवर नेण्याचा निर्णय घेण्यात आला असून ही मोहीम सांगे व वाळपाई येथून सुरू झाली, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी दिली.

मडगाव
गट काँग्रेस समितीच्या कार्यकर्त्यांद्वारे हे आंदोलन गाव पातळीवर नेण्यात येणार असून आज याची सुरवात सांगे आणि वाळपई गट काँग्रेसकडून करण्यात आली.
भाजप सरकारने डिझेलवर अबकारी कर ८२० टक्के, तर पेट्रोलवर २५८ टक्के केला आहे. त्यावर गोवा सरकार पेट्रोलवर २५ टक्के, तर डिझेलवर २२ टक्के व्हॅट आकारत आहे. आशियात इतर देशात पेट्रोलच्या किमती ४५ ते ६० रुपयांपर्यंत सीमित असताना फक्त भारतात दर ८० रुपये प्रति लिटर एवढा आहे. याकडे त्यांनी लक्ष वेधले. काँग्रेस कार्यकर्ते वाढलेल्या वीज बिलावरही आवाज उठविणार आहेत, असे त्यांनी सांगितले.

 

संबंधित बातम्या