कॉंग्रेस केवळ अफवा पसरवण्यापुरता शिल्लक राहिला"भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शाहनवाज हुसेन यांचा हल्लाबोल

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 11 जानेवारी 2021

कॉंग्रेस पक्षाला लोकांनी ओळखलं आहे.या पक्षाची गरज आता केवळ अफवा पसरवण्यापुरतीचं शिल्लक राहिला.

पणजी: कॉंग्रेस पक्षाला लोकांनी ओळखलं आहे.या पक्षाची गरज आता केवळ अफवा पसरवण्यापुरतीचं शिल्लक राहिला असल्याची जहरी टिका भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शाहनवाज हुसेन यांनी पणजीमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली. यापुढे म्हणाले, कॉंग्रेस फक्त आता ट्वीटरपुरताचं मर्यादित राहिला आहे.

माजी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी 'वीर तुम आगे बढो' असं म्हणतात आणि स्वत: मात्र इटलीला निघून जातात.लोकसभेच्या निवडणुकीत जनतेने कॉंग्रेसला विरोधी पक्षाचा दर्जाही दिला नाही.जनतेनं कॉंग्रेसला साफ नाकारलं.अलीकडे झालेल्या काश्मीरमधील पंचायत निवडणूकातही भाजपने चांगले यश मिळवले आहे. भाजपचा विश्वास हा विकासावर आहे.त्यामुळे गोव्यातील आगामी काळात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एखदा भाजपचे सरकार स्थापन होणार हे मात्र नक्की.

संबंधित बातम्या