Goa: राहुल गांधींच्या वाढदिवसानिमीत्त काँग्रेसकडुन सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन

congress goa.jpg
congress goa.jpg

कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या वाढदिवसाचे  औचित्य साधून आज गोवा प्रदेश महिला काँग्रेसने औषधी वनस्पती व इतर झाडांच्या रोपट्यांच्या वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता. अल्तो बेला व्हिस्टा, सांगोल्डा येथे आयोजित या कार्यक्रमात बोलतांना गोवा प्रदेश महिला काँग्रेस अध्यक्षा बीना शांताराम नाईक म्हणाल्या, आता आपण रोपांची लागवड केली, वृक्ष संवर्धन केलं तर भविष्यात आपण वैश्विक तापमान वाढ, प्रदूषण अशा समस्यांशी यशस्वीपणे लढू शकू. यावेळी त्यांनी 1973 साली घडलेल्या 'चिपको आंदोलनाची' आठवण करून दिली. (Congress organizes social programs on the occasion of Rahul Gandhi's birthday)

मोले अभयारण्याचा नाश करून आपले अती महत्त्वाकांक्षी तीन प्रकल्प राबवण्याची इच्छा बाळगणाऱ्या भाजपा सरकारचा निषेध करून  नाईक म्हणाल्या. या प्रकल्पासाठी दहा हजारांहून अधिक वृक्षांची कत्तल होणार आहे. पर्यावरणीय संरक्षणासाठी आपण या प्रकल्पास तीव्र विरोध केला पाहिजे. विकासाच्या नावाखाली होणारी बेसुमार वृक्षतोड थांबवली पाहिजे.

कोविड महामारीच्या काळात ऑक्सिजनचा निर्माण झालेला प्रचंड तुटवडा लक्षात घेता वृक्षारोपण आणि संगोपन ही काळाची गरज आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे, असेही त्या म्हणाल्या. 

महिला कॉंग्रेस च्या सॅंन्ड्रा फर्नांडिस यांनी आयोजित केलेल्या औषधी वनस्पतींच्या रोप वाटपाच्या या कार्यक्रमाचा सांगोल्डा भागातील अनेक शेतकरी आणि रहिवाश्यांनी लाभ घेतला. कार्यक्रमात सँड्रा फर्नांडिस म्हणाल्या, निसर्ग मनुष्या शिवाय जगू शकतो, तग धरू शकतो पण मनुष्य निसर्गा शिवाय जगू शकत नाही. त्यामुळे निसर्गाचं संगोपन आणि संवर्धन करणं आपलं आद्य कर्तव्य आहे. या कार्यक्रमास महिला कॉंग्रेसच्या प्रिया राठोड, प्रतिभा बोरकर उपस्थित होत्या.

दरम्यान शिवोली युथ कॉंग्रेसकडून आसगांवातील आश्रमात कडधान्याचे वाटप करण्यात आले आहे. तसेच काणकोणातही प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस जनार्दन भंडारी, महादेव देसाई व अन्य कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी वाढदिवसानिमित्त रोपट्याचे वितरण केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com