Vasco News : वास्को शहरात निकृष्ट कामे काँग्रेसच्या मेल्विन फर्नांडिस यांचा आरोप

स्थानिकांना पूर्व सूचना न देता रस्ता बंद केल्याने, सध्या शहरातील वाहतुकीवर मोठ्या प्रमाणात ताण पडत आहे.
Vasco
Vasco Gomantak Digital Team

वास्को शहरातील रस्‍ता कामांचे नियोजन नाही. अनेक समस्या असून शहरांतर्गत इतर कामेही निकृष्ट दर्जाची आहेत. एफएल गोम्स रस्त्यावर मुरगाव पत्तन प्राधिकरण(एमपीए), गॅमन इंडीया कंत्राटदार, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे उभारण्यात येणाऱ्या ‘अपर रॅम्प’ कामाला सक्त मनाई करण्याचा आदेश जारी करावा, अशी मागणी वास्को काँग्रेस गटाध्यक्ष अॅड. मेल्विन फर्नांडिस यांनी केली आहे.

एफएल गोम्स रस्त्यावरून राष्ट्रीय महामार्गाच्या उड्डाण पुलाला जोडणाऱ्या उतारावर अपर रॅम्प करण्यासाठी स्थानिकांना पूर्व सूचना न देता रस्ता बंद केल्याने, सध्या शहरातील वाहतुकीवर मोठ्या प्रमाणात ताण पडत आहे.

Vasco
Panaji Smart City Work: मुख्यमंत्री म्हणतात, या पावसाळ्यात पणजीतील रस्त्यांवर पाणी येणार नाही; कारण...

तसेच एफएल गोम्स रस्ता बंद करण्यासाठी राज्य सरकारच्या कोण कोणत्या विभागाने गॅमन इंडिया, एमपीए व इतर संबंधितांना परवानगी देण्यात आली, यांची माहिती वृत्तपत्रांबरोबर रस्त्याच्या बाजूस फलक उभारून देणे आवश्यक आहे. गॅमन इंडिया व इतरांनी रस्ता बंद करण्यासाठी लागणारे नियमांचे उल्लंघन करून रस्ता वाहतुकीसाठी बंद केली आहे, असा आरोप ॲड. फर्नांडिस यांनी केला आहे.

Vasco
Goa Politics : मंत्री, आमदारांमध्ये मतभेद उफाळले; राणे-मायकल आमनेसामने

अखेर गॅमन इंडिया कंत्राटदारांनी वास्को एफएल गोम्स रस्ता खोदण्यात सुरुवात केली. उत्तर गोव्यात रस्त्यावर खोदकाम करण्यात सक्त मनाई जिल्हाधिकारी कार्यालयातून काढण्यात आला आहे. परंतु दक्षिण गोवा जिल्हाधिकारी अजूनही दक्षिणेत रस्त्यावर खोदकाम करण्यात मनाई करण्याचा आदेश जारी करीत नसल्याने फर्नांडिस यांनी नाराजी व्यक्त केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com