Goa Politics: मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या नेतृत्वातील भाजप सरकार निर्लज्ज; काँग्रेस अध्यक्ष चोडणकर

सरकारने डॉ. लोहिया मैदानावरील हुतात्मा स्मारक २४ तासात सुरक्षित स्थळी हलविण्याची गिरीश चोडणकर यांची मागणी (Goa Politics)
गोव्याचे कोंग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी डॉ लोहिया मैदानावरील हुतात्मा स्मारकाचा मुद्दा उचलला (Goa Politics)
गोव्याचे कोंग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी डॉ लोहिया मैदानावरील हुतात्मा स्मारकाचा मुद्दा उचलला (Goa Politics) Dainik Gomantak

Goa Politics: गोव्यातील मुर्ख मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (CM Dr Pramod Sawant) यांच्या नेतृत्वाखालील निर्लज्ज भाजप सरकारला (Goa BJP Govt.) गोवा मुक्तीसाठी सर्वस्व दिलेल्या हुतात्म्यांबद्दल तसेच स्वातंत्र्यसैनीकांबद्दल आदर नाही. लोहिया मैदानावरुन गायब झालेला डॉ. लोहियांचा पुतळा (Dr. Lohiya Statue) काल कंत्राटदाराच्या गोदामात सापडला. दुर्देवाने तेथील हुतात्मा स्मारक मात्र लोहिया मैदानावरच आज उघड्यावर टाकुन दिल्याचे आढळुन आले आहे. सरकारने जर सदर हुतात्मा स्मारक येत्या २४ तासात सुरक्षित स्थळी हलविले नाही तर कॉंग्रेसचे कार्यकर्ते सदर पुण्यकार्य स्वतः करतील, असा इशारा कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर (Goa Pradesh Congress President Girish Chodankar) यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंताना दिला आहे.

गोव्याचे कोंग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी डॉ लोहिया मैदानावरील हुतात्मा स्मारकाचा मुद्दा उचलला (Goa Politics)
Goa: ३४ टक्के लोकांना लसीचा दुसरा डोस

भाजप सरकार गोव्यासाठी सर्वस्वाचा त्याग केलेल्या स्वातंत्र्यसैनिक व हुतात्म्यांचा वारंवार अपमान करीत आहे. भाजपचे बेगडी देश प्रेम यातुन उघड होत आहे, असे गिरीश चोडणकर म्हणाले. लोहिया मैदानावरील पुतळा तसेच हुतात्मा स्मारक व तेथील ऐतिहासीक नामफलक हे केवळ अधिकृत व तज्ञांच्या देखरेखीखाली व स्वातंत्र्यसैनीकांच्या मार्गदर्शनाखाली हाताळणे गरजेचे आहे. आज दिवाळखोर झालेले भाजप सरकार ऐतिहासीक दस्तऐवज, पुतळे तसेच स्मारके क्रोनी क्लबला विकण्यासही मागे पुढे पाहणार नाही, असा टोला गिरीश चोडणकर यांनी हाणला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com