रेल्वे डबलिंग आमका नाका..!

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 10 नोव्हेंबर 2020

आज कॅसलरॉक ते वास्को लोहमार्ग  दुपदरीकरणाला विरोध करण्याकरिता काँग्रेसने हुबळी येथे दक्षिण पश्चिम रेल्वे मुख्यालयासमोर आंदोलन केले.

हुबळी :  राज्यात आयआयटी मेळावली, मोले येथील अभयारण्य याप्रमाणेच कॅसलरॉक ते वास्को लोहमार्ग दुपदरीकरणालादेखील प्रखर विरोध होत आहे. याच पार्श्वभूमीवर आज कॅसलरॉक ते वास्को लोहमार्ग  दुपदरीकरणाला विरोध करण्याकरिता काँग्रेसने हुबळी येथे दक्षिण पश्चिम रेल्वे मुख्यालयासमोर आंदोलन केले. यावेळी आमका नाका, आमका नाका रेल्वे ट्रॅकिंग आमका नाका अशा घोषणा देण्यात आल्या.या आंदोलनात काँग्रेस पदाधिकारी तसेच कार्यकर्ते सहभागी झाले होते. आंदोलनाचे नेतृत्व प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर आणि विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी केले. 

संबंधित बातम्या