डिचोलीत काँग्रेसकडून योगी आदित्यनाथ यांच्या प्रतिमेचे दहन

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 3 ऑक्टोबर 2020

 हाथरस जिल्ह्यातील पीडित तरूणीच्या कुंटुंबीयांची भेट घेण्यास जाताना काँग्रेसचे नेते राहूल गांधी आणि सरचिटणीस प्रियांका गांधी यांना पोलिसांच्या दडपशाहीचा वाईट अनुभव आला.

डिचोली- उत्तर प्रदेशमध्ये घडलेल्या हाथरस जिल्ह्यातील तरूणीवर अत्याचार करून खून प्रकरणी पोलिसांनी केलेल्या  दडपशाहीच्या निषेधार्ह डिचोली गट काँग्रेसतर्फे आज डिचोलीत निदर्शने करण्यात आली. उत्तर प्रदेश सरकारच्या विरोधात निदर्शने करत आणि या घटनेचा निषेध करत उत्तर प्रदेशते मुख्यमंत्री योगी यांच्या प्रतिमेचे दहनही करण्यात आल.

 हाथरस जिल्ह्यातील पीडित तरूणीच्या कुंटुंबीयांची भेट घेण्यास जाताना काँग्रेसचे नेते राहूल गांधी आणि सरचिटणीस प्रियांका गांधी यांना पोलिसांच्या दडपशाहीचा वाईट अनुभव आला.

या घटनेचे सर्वत्र पडसाद उमटत आहेत. डिचलीतही या घटनेचे तीव्र पडसाद उमटले आहेत. डिचोलीत काँग्रेसतर्फे या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला. महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आल्यानंतर डिचोलीत गट काँग्रेसचे अध्यक्ष मेघश्याम राऊत यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे कार्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळ बगलमार्गावर एकत्रित आले. काँग्रेस कार्यकर्त्यांनी योगी सरकार विरोधात घोषणा देत त्यांच्या प्रतिमेचे दहन करण्यात आले. 

संबंधित बातम्या