आझाद मैदानावर काँग्रसचे धरणे आंदोलन

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 6 नोव्हेंबर 2020

महिला व दलित अन्याय विरोधीदिन या देशव्यापी आंदोलनाचा एक भाग म्हणून कॉंग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी  आझाद मैदानावर दोन तासांचे धरणे आंदोलन केले.

पणजी :  महिला व दलित अन्याय विरोधीदिन या देशव्यापी आंदोलनाचा एक भाग म्हणून कॉंग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आझाद मैदानावर दोन तासांचे धरणे आंदोलन केले. या आंदोलनात कॉंग्रेसचे विधीमंडळ गटनेते दिगंबर कामत, प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, महिला कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष ॲड. प्रतिमा कुतिन्हो, अनुसुचित जाती विभागाचे प्रमुख विठू मोरजकर, माजी उपसभापती शंभू भाऊ बांदेकर आदी सहभागी झाले होते.

या आंदोलनात प्रदेश उपाध्यक्ष एम. के. शेख, संकल्प आमोणकर, प्रदेश सरचिटणीस अमरनाथ पणजीकर, जनार्दन भंडारी, युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ॲड. वरद म्हार्दोळकर, शंकर किर्लपालकर, प्रताप गावस, रुडॉल्फ फर्नांडिस, बीना नाईक यांनीही सहभाग घेतला होता. याशिवाय कॉंग्रेसचे राज्यभरातील प्रमुख कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

संबंधित बातम्या