Congress MLA: मुख्यमंत्र्यासह बंडखोर आमदार दिल्ली दरबारी

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांची घेतली भेट
Amit-shah
Amit-shahDainik Gomantak

गोव्यात गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला काँग्रेस सोडून भाजपमध्ये दाखल झालेले 7 आमदारांनी आज दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा अन् भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांची भेट घेतली आहे. यावेळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह अनेक भाजप नेत्यानींही हजेरी लावली. मात्र यावेळी मायकल लोबो हे उपस्थित न्हवते अशी माहिती समोर आली आहे.

(Congress rebel MLAs along with Chief Minister Pramod Sawant met Amit Shah and J P Nadda)

Amit-shah
Revolutionary Goans: पक्षांतर करणाऱ्या आमदारांनी देवांनाच गहान ठेवले

भाजपच्या अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आमदारांचा हा गटाने दिल्ली दौऱ्यात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि गृहमंत्री अमित शहा यांचीही भेट घेतली आहे. असे असले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही भेट ते घेणार होते. मात्र याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. यावेळी राज्यातील मंत्रीमंडाळात खांदेपालट होण्यावरुन ही चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर येऊ शकलेली नाही.

Amit-shah
'Friendship Moto Cup: आंतरराष्ट्रीय स्पर्धेत गोव्याचे दोन रायडर्स होणार सहभागी

या वर्षी झालेल्या गोवा विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात भाजप पुन्हा सत्तेत आले. चाळीस सदस्यांच्या गोवा विधानसभेत 20 आमदार होते, तर काँग्रेसच्या आमदारांची संख्या 11 होती, मात्र आता 8 आमदारांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्याने हे समीकरण बदलले आहे. आता विधानसभेत भाजपचे 28 आमदार आहेत, तर काँग्रेसचे फक्त 3 आमदार शिल्लक आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com