दिगंबर कामत यांच्यावर काँग्रेसची कारवाई; महत्वाच्या पदावरुन केली हकालपट्टी

गोवा काँग्रेसचे नेते, माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांची अखिल भारतीय काँग्रेस वर्किंग कमिटीतून कायम निमंत्रित सदस्य पदावरून हकालपट्टी करण्यात आली
Digambar Kamat
Digambar KamatDainik Gomantak

गोवा काँग्रेसचे नेते, माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांची अखिल भारतीय काँग्रेस वर्किंग कमिटीतून कायम निमंत्रित सदस्य पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. नुकतीच राष्ट्रीय काँग्रेसने याबद्दलची माहिती दिली आहे.

Digambar Kamat
मुरगाव पालिकेची ‘हिंदुस्थान पेट्रोलियम’ ला सूचना

गेले काही दिवस कामत यांच्यावर गोवा भाजपशी जवळीक साधत अनेक काँग्रेस नेत्यांना भाजपमध्ये सामील होण्यासाठी भुमिका घेतल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. अनेक कारणावरुन गोवा काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह सुरु होता. याबाबत आता राष्ट्रीय काँग्रेसने हा निर्णय घेतला आहे.

Digambar Kamat
सत्तरीला वादळाचा दणका; तब्‍बल 20 वीजखांब आडवे

कामत यांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला

या पूर्वी गोवा काँग्रेस प्रभारी दिनेश गुंडूराव यांनी कामत यांच्याबाबत बोलताना कामत यांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला अशी प्रतिक्रिया दिली होती. तसेच कामत यांनी देखील माध्यमांशी बोलताना आपण नाराज असल्याचं मान्य केले होते. मात्र पक्षांतराबाबत आपला कोणता ही विचार नाही असे ही सांगितले होेते. त्यामूळे काँग्रेसमधील ही धुसफूस थांबेल अशी स्थिती असताना राष्ट्रीय काँग्रेसने कारवाईचा बडगा उचलत कामत यांना मोठा झटका दिला आहे.

मायकल लोबो यांची विरोधी पक्षनेतेपदावरून हकालपट्टी

गेल्या आठवड्यात, काँग्रेसने मायकल लोबो यांची गोवा विधानसभेतील विरोधी पक्षनेते पदावरून हकालपट्टी केली होती. याबाबत स्पष्टीकरण देताना काँग्रेसने म्हटले होते की, भाजप 2/3 विभाजनाचा प्रयत्न करीत आहे. तसेच काँग्रेस नेत्यांना मोठ्या प्रमाणात पैसे देऊ केले आहेत. असा ही आरोप भाजपवर करण्यात आला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com