गद्दारांना काँग्रेसमध्ये पुन्हा प्रवेश देऊ नये

प्रतिनिधी
बुधवार, 9 सप्टेंबर 2020

उत्तर गोवा गटाध्यक्ष व जिल्हा कार्यकारिणी सदस्यांची मागणी

म्हापसा: काँग्रेस पक्षाशी गद्दारी करून भाजपचा हात धरणाऱ्यांना पुन्हा पक्षात प्रवेश किंवा स्थान देऊ नये, अशी आग्रही मागणी उत्तर गोवा गटाध्यक्ष व जिल्हा कार्यकारिणी सदस्यांच्या आढावा बैठकीत करण्यात आली.

यासंदर्भात पत्रकार परिषदेत माहिती देताना उत्तर गोवा जिल्हाध्यक्ष विजय भिके म्हणाले, की जनहितार्थ प्रत्येक मतदारसंघातील प्रश्न पक्षातर्फे प्रखरपणे मांडले जातील. काँग्रेस उत्तर गोवा गटाध्यक्ष व जिल्हा कार्यकारिणी सदस्यांची ही बैठक ही आज सोमवारी काँग्रेस उत्तर गोवा गटाध्यक्ष व जिल्हा कार्यकारिणी सदस्यांची आढावा बैठक म्हापसा येथे जिल्हाध्यक्ष विजय भिके यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या पत्रकार परिषदेला अमित नाईक, चंदन मांद्रेकर, भोलानाथ घाडी हे पदाधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत पर्ये गटाध्यक्षपदी रमेश पणशीकर, तर मये गटाध्यक्षपदी संदीप नाईक यांची निवड जाहीर करण्यात आली व भिके यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्रे देण्यात आली.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून पक्षाने तयारी सुरू केली असून, त्याचे सकारात्मक परिणाम लवकरच दिसतील, असा दावा या वेळी भिके यांनी केला. येत्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार  निवडून येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
 

संबंधित बातम्या