'भाजपने आता मॅनिफेस्टो नाही तर 'मनिफेस्टो' जाहीर करायला पाहिजे'
Congress and BJPDainik Gomantak

'भाजपने आता मॅनिफेस्टो नाही तर 'मनिफेस्टो' जाहीर करायला पाहिजे'

असा टोला काँग्रेस समितीचे सरचिटणीस सुनील कवठणकर यांनी लगावला.

पणजी: मागील निवडणुकीत दिलेली आश्‍वासने गेल्या पाच वर्षांत पूर्ण करण्यात भाजप सरकारला अपयश आले आहे. त्यांची प्रत्येक आश्‍वासने फसली आहेत. त्यांनी फक्त आश्‍वासने देण्याचाच विकास केल्याचा आरोप करत प्रदेश काँग्रेस समितीचे सरचिटणीस सुनील कवठणकर यांनी भाजपच्या (BJP) मागील जाहीरनाम्यातील आश्‍वासनांचा पंचनामा केला. (BJP Goa Assembly Election Latest News)

Congress and BJP
Goa Election: भाजपची पहिली उमेदवार यादी 16 जानेवारीला जाहीर होणार?

खनिज व्यवसाय पुन्हा सुरू करण्यात आणि गोव्याला पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध करण्यात सरकार अपयशी ठरले. त्यामुळे राज्याची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडली. भाजप आणि संबंधित मंत्री कला आणि संस्कृती क्षेत्रात प्रगती करण्यात अपयशी ठरले. अनेक तालुक्यांमध्ये जाहीर झालेली रवींद्र भवने रखडली आहेत. भाजपने कामाची निविदा न काढताच कला अकादमीच्या नुतनीकरणावर पैसे खर्च केले. गोव्यात स्थानिक कलाकारांना प्रोत्साहन देण्यात आणि कला, सांस्कृतिक पर्यटनाला चालना देण्यात भाजप अपयशी ठरला, असे कवठणकर म्हणाले.

भाजपने आता मॅनिफेस्टो नाही तर 'मनिफेस्टो' जाहीर करायला पाहिजे, जेणेकरून त्यांच्या राजवटीत किती भ्रष्टाचार झाला आहे, हे जनतेला कळेल. गोवा जगाच्या नकाशावर आहे. मात्र, विकास आणि पर्यटनाला चालना देण्यात भाजप सरकार अपयशी ठरले. भाजप रोजगार निर्माण करण्यात अयशस्वी ठरला आहे. तथापि नोकऱ्या (Jobs) विकल्या गेल्या, असा आरोप खुद्द भाजपचेच आमदार करत आहेत. वाजपेयींचे नाव दिलेल्या अटल सेतू पुलाची देखभाल करण्यात भाजपला अपयश आले. अटल सेतूची खड्यांमुळे दुरवस्था झाली आहे. निदान भाजपने तरी वाजपेयींच्या नावाचा आदर ठेवून गोमंतकीयांसाठी चांगल्या दर्जाचा पूल देण्याची गरज होती.

भाजपने महागाईशी निगडित योजना राबविण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्याचा लाभ लोकांना झाला नाही. अंगणवाडी शिक्षिकांवर लाठीचार्ज करण्यात आला. कोविडचा (COVID-19) सामना करण्यात भाजप सरकार अपयशी ठरले असून आरोग्य क्षेत्राची अवस्था बिकट आहे. आयुष रुग्णालये प्रत्यक्षात आलेली नाहीत. प्रत्येक क्षेत्रात हे सरकार अपयशी ठरले आहे, असे ते म्हणाले.

दुहेरी इंजिन, तरीही राज्य मागेच दुहेरी इंजिनचे सरकार असतानाही जाहीरनामा प्रत्यक्षात प्रत्यक्षात आणण्यात का अपयशी ठरले, हे भाजपने निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी गोव्यातील जनतेला सांगावे. वाहतूक गैरव्यवस्थापन हे गोव्यात सर्वत्र दिसते. हॉटमिक्सिंग योग्यप्रकारे केले जात नाही. यामुळे वाहन दुरुस्तीवर मालकांना भुर्दंड सहन करावा लागत आहे. दळण-वळणाच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यात भाजप अपयशी ठरला आहे. रात्रीच्या वेळी सार्वजनिक वाहतूक उपलब्ध नसते. म्हापसा व मडगाव येथील बसस्थानकांची दुरवस्था झाली आहे, असे कवठणकर म्हणाले.

Congress and BJP
Goa Weather Updates: राज्यात गारठ्यासोबत रविवारपर्यंत धुकेही पडणार

पाणी पिण्यायोग्य नाही, बिले भरमसाट

गोव्यातील जनतेला हायस्पीड ब्रॉडबँड देण्यात भाजप अपयशी ठरले असून प्रत्येक निवडणुकीत तेच आश्‍वासन पक्षाकडून दिले जाते. वीज पुरवठा आणि पिण्यायोग्य पाणी पुरवण्यात अपयश आले. मात्र, लोकांना वाढीव बिले भरावी लागत आहेत. इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. समुद्रकिनारे आणि पर्यटन स्थळे प्लास्टिकमुक्त करण्याचे आश्वासन दिले होते. त्याची अंमलबजावणी कुठे आहे, असा प्रश्न कवठणकर यांनी केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com