गोवा विधानसभेत गाजणार खाणप्रश्‍न; सरकारला कोंडीत पकडण्यासाठी काँग्रेसची तयारी सुरू

तीन रेषीय प्रकल्पही ऐरणीवर : अधिवेशनासाठी काँग्रेस सज्ज
गोवा विधानसभेत गाजणार खाणप्रश्‍न; सरकारला कोंडीत पकडण्यासाठी काँग्रेसची तयारी सुरू
Goa Legislative Assembly Dainik Gomantak

मडगाव : विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच होत असलेल्या पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी भाजप सरकारला कोंडीत पकडण्यासाठी प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने तयारी सुरू केली आहे. तीन रेषीय प्रकल्पाबरोबरच रेल्वे मार्ग दुपदरीकरण आणि कोळशाचे प्रदूषण हे प्रश्नही गाजण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे आमदार संकल्प आमोणकर यांनी ही माहिती दिली.

Goa Legislative Assembly
विशेष व्यक्तींसाठी पंचायती राज कायद्यात सुधारणा करा; दिव्यांगजन आयुक्तांचा निर्देश

वास्को येथील कोळशाचे प्रदूषण आणि रेल्वे मार्ग दुपदरीकरणाचे लोकांवर होणारे वाईट परिणाम या दोन मुद्द्यांवर सरकारला घेरणार असल्याचे त्यांनी सांगितले. जुलै महिन्यात हे अधिवेशन भरणार असून यावेळी आम्ही संघटितपणे विरोधी पक्षाची भूमिका निभावू, असे आमोणकर म्हणाले. अधिवेशनात कुठले प्रश्न चर्चेत आणायचे, यावर आमची शुक्रवारी प्राथमिक स्वरूपाची चर्चा झाली. सर्व आमदारांना घेऊन आम्ही लवकरच पुन्हा भेटून रणनीती ठरविणार असल्याचे त्यांनी सांगितले.

‘टीम गोवा’ या नावाखाली काँग्रेससोबत युती करून निवडणूक लढविलेल्या गोवा फॉरवर्डने येणाऱ्या अधिवेशनात काँग्रेससोबत एकत्र येऊन सरकारला कात्रीत अडकविण्याऐवजी स्वतः वेगळी रणनीती आखण्याचे ठरविले आहे. काँग्रेसच्यासोबत अधिवेशनास सामोरे जाण्याचा अजून निर्णय घेतलेला नाही, असे पक्षाध्यक्ष विजय सरदेसाई यांनी सांगितले. गोवेकरांच्या हिताआड येणारे सर्व मुद्दे आम्ही चर्चेत आणू. मुख्यतः पर्यावरण विषयाचा त्यात समावेश असेल, असे सरदेसाई यांनी सांगितले.

Goa Legislative Assembly
गोव्यातील ‘धवरूख’ संस्थेची झाडे उद्‍ध्वस्त

या अधिवेशनात खाणी परत सुरू करण्याच्या सरकारच्या प्रस्तावावरही चर्चा होणार असल्याचे संकेत काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार दिगंबर कामत यांनी दिले. अजून अधिवेशन सुरू होण्यास बराच वेळ आहे. शेवटच्या 10 दिवसांत विरोधकांची रणनीती ठरणार, असे ते म्हणाले. सध्या गोवा सरकारने 88 खाणींच्या लीजांची पावणी करून त्या परत सुरू करण्याचे ठरविले आहे. मात्र, जुन्या लीजधारकांनी भूपृष्ठ मालकी हक्काचा मुद्दा उपस्थित करून हा विषय परत न्यायालयात नेला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com