Goa Congress: फोंडा पालिका निवडणुकीत काँग्रेस उतरणार

युरी आलेमाव ः भाजप सरकारच्या भूलथापांना बळी पडू नका
Goa Congress
Goa CongressDainik Gomantak

भारतीय जनता पक्षाला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी संघटीत होऊया, असे आवाहन करताना फोंडा पालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसचे पॅनल उतरवले जाईल, असे काँग्रेसचे नेते तथा विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी फोंड्यातील काँग्रेसच्या सभेत जाहीर केले.

काँग्रेसच्या ‘हात से हात जोडो’ अभियाना निमित्त फोंड्यात आज शनिवारी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते.

या सभेला खासदार फ्रान्सिस सार्दिन, आमदार कार्लूस फरेरा, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर तसेच काँग्रेसचे फोंड्यातील नेते राजेश वेरेकर व प्रदेश समितीचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

युरी आलेमाव म्हणाले, भारतीय जनता पक्षाने सत्तेसाठी कोणत्याही थराला जाण्याची तयारी ठेवली आहे. धर्माच्या नावावर भाजपकडून राजकारण केले जात असून गोमंतकीयांनी भाजपच्या भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन करताना यावेळेला फोंडा पालिका काँग्रेसचीच असेल असे जाहीर केले.

Goa Congress
Goa Police: दिल्लीत प्रशिक्षणास गेलेल्या पोलिसांना अन्न विषबाधा

खासदार सार्दिन म्हणाले, भाजपकडून घाणेरडे राजकारण केले जाते. यावेळेला फोंडा पालिका ही काँग्रेसचीच असेल.

अमित पाटकर म्हणाले, भाजपचे दिवस आता भरले असून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असल्याने काँग्रेसचेच राज्य येईल असे नमूद केले फोंड्यातील पालिका निवडणुकीत काँग्रेसचे पॅनल निवडून येईल अशी ग्वाही दिली. जॉन परेरा यांनी सूत्रसंचालन केले.

समस्यांचा पाढा!

राजेश वेरेकर यांनी फोंड्यातील समस्यांचा पाढा वाचताना फोड्यातील रखडलेली विकासकामे हे भाजपचे अपयश असल्याचे सांगितले. भाजपने धर्माच्या नावावर राजकारण केले असून आता या लोकांना घरी पाठवूया असे आवाहन करताना फोंडा पालिका निवडणुकीत काँग्रेस पॅनलला बहुमताने निवडून आणूया असे आवाहन केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com