गोव्यात काँग्रेसचा गांजा लागवडीस तीव्र विरोध

दैनिक गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 30 डिसेंबर 2020

गोवा सरकारने औषधी उपयोगासाठीसुद्धा गांजा लागवडीस परवानगी देऊ नये. तसे केल्यास जन आंदोलन उभे करण्याचा इशारा काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अमरनाथ पणजीकर यांनी आज दिला. 

पणजी- गोवा सरकारने औषधी उपयोगासाठीसुद्धा गांजा लागवडीस परवानगी देऊ नये. तसे केल्यास जन आंदोलन उभे करण्याचा इशारा काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अमरनाथ पणजीकर यांनी आज दिला. 

याबाबत अधिक बोलताना ते म्हणाले, 'पोलिसांनी पकडलेल्या अंमली पदार्थांना पाय फुटतात. त्यामुळे औषधी उपयोगासाठी गांजाची लागवड केल्यास तो गांजा बाजारात पोहचणार नाही याची हमी कोणीही देऊ शकणार नाही.  अंमली पदार्थांना या भूमीत थारा नको. सरकारने तरीही गांजा लागवडीस परवानगी दिल्यास जन आंदोलन उभे केले जाईल.' 

 यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत  त्यांच्या सोबत काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस जनार्दन भंडारी उपस्थित होते.

संबंधित बातम्या