‘रालोआ’तील घटक पक्षांशी गोवा काॅंग्रेस युती करणार का?

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 12 नोव्हेंबर 2020

काॅंग्रेस पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील घटक पक्षाशी राजकीय आघाडी वा युती करू शकत नाही असे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी स्पष्ट केले.

पणजी :  कॉंग्रेस पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील घटक पक्षाशी राजकीय आघाडी वा युती करू शकत नाही असे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी स्पष्ट केले. गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी कॉंग्रेसने भाजपेतर पक्षांना एकत्र आणावे, असे आवाहन केले होते. त्यावर प्रतिक्रीया व्यक्त करताना चोडणकर यांनी हे विधान केले.
भाजपेतर पक्षांनी एकत्र यावे ही संकल्पना म्हणून चांगली आहे मात्र ती वस्तुस्थिती नाही.

राष्ट्रीय लोकशाही आघाडीत राहून विरोधी पक्षांची युती करता येत नाही हे राजकीय गणित समजून घेतले पाहिजे. कॉंग्रेसने संघटनात्मक बांधणी उत्तमरीत्या केली आहे. जनतेचे प्रश्न हाती घेत विरोधी पक्षाची भूमिका आक्रमकपणे वठवणे सुरू केले आहे. कॉंग्रेस कुठे आहे, अशी विचारणा करणाऱ्यांना त्याचमुळे भाजपेतर पक्षांची मोट कॉंग्रेसने बांधावी असे आता वाटू लागले आहे. कॉंग्रेसच्या वाढच्या ताकदीचा हा परीणाम आहे. मात्र दुसऱ्या घरात जाण्यासाठी आधी आहे त्या घरातून बाहेर निघावे लागते याचे किमान भान या संकल्पनाकारांनी ठेवले पाहिजे. कॉंग्रेस कधीही रालोआतील घटक पक्षाशी युती किंवा आघाडी करू शकत नाही ही साधी बाबही लक्षात येत नाही याचेच आश्चर्य वाटते.

संबंधित बातम्या