म्हादई नदीचे संवर्धन गरजेचे!

‘म्हायगायेचों जागर’ : पी. चिदंबरम यांच्याकडून बाजारपेठेतही जनजागृती
म्हादई नदीचे संवर्धन गरजेचे!
Mandovi RiverDainik Gomantak

म्हापसा : गोव्याचे पर्यावरण अबाधित राखून सकारात्मक विकास व्हावा, असा मुद्दा उपस्थित करून वनसंपदा, प्राणिमात्र आणि गोव्याची जीवनदायिनी म्हादई नदीचे (Mandovi River) संवर्धन करणे आवश्यक आहे, असे मत माजी केंद्रीय अर्थमंत्री (Former Union Finance Minister) पी. चिदंबरम (P. Chidambaram) यांनी स्पष्ट केले. गोव्याच्‍या सर्वांगीण आर्थिक उन्नतीसाठी तसेच आर्थिक विकास, सामाजिक उत्थान, रोजगाराच्या संधी यासाठी गोव्याच्या जनतेने येत्या विधानसभा निवडणुकीत निर्णायक भूमिका बजावून कॉंग्रेसला सत्तेत आणावे, असे आवाहनही त्यांनी केले.

पी. चिदंबरम यांच्या उपस्थितीत म्हापसा बाजारपेठेत ‘म्हायगायेचों जागर’ या मोहिमेच्या अंतर्गत काँग्रेस पक्षातर्फे जनजागृती करण्यात येऊन विक्रेत्यांना तसेच ग्राहकांना पत्रकांचे वाटप करण्यात आले. यानिमित्ताने चिदंबरम यांनी काही विक्रेत्यांशी तसेच ग्राहकांशी वाढत्या महागाईबाबत स्नेहसंवाद साधला.

Mandovi River
गोवा विभागातील सिनेमांचे गुपित कायम!

या मोहिमेत पक्षाचे उपाध्यक्ष एम. के. शेख, प्रमोद साळगावकर, बाबी बागकर, उत्तर गोवा काँग्रेस अध्यक्ष विजय भिके, पक्षाचे गोव्यातील माध्यम प्रमुख अमरनाथ पणजीकर, पक्षाचे स्थानिक नेता तथा माजी नगराध्यक्ष सुधीर कांदोळकर, नगरसेवक तथा म्हापसा गट काँग्रेसचे अध्यक्ष ॲड. शशांक नार्वेकर, हळदोणा गट अध्यक्ष अश्विन डिसोझा, म्हापसा गट युवा अध्यक्ष हिमांशू तिवरेकर, हळदोणेचे युवा अध्यक्ष विठ्ठल आरोंदेकर, कळंगुटचे माजी आमदार आग्नेल फर्नांडिस, नगरसेवक तारक आरोलकर, विकास आरोलकर व इतर नेत्यांचा सहभाग होता. सरकारचा लेखाजोखा उघडा पडणार

केंद्रातील व राज्यातील भाजप सरकामुळे आज सर्वसामान्य मेटाकुटीला आला आहे. जनतेचा आवाज बुलंद व्हावा, सरकारला आतातरी जाग यावी या उद्देशाने ‘म्हायगायेचों जागर’ अभियान राबविण्यात येत आहे. इंधन, गॅस सिलिंडर व इतर जीवनावश्यक वस्तूंमध्ये भरमसाठ वाढ करून सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्किल केले आहे. सरकारने आता जनतेच्या सहनशीलतेचा अंत न पाहता महागाई नियंत्रणात आणावी, असे आवाहनही कॉंग्रेस नेत्यांनी केले. ‘म्हायगायेचों जागर’ या अभियानातून सरकारचा लेखाजोखा उघडा पाडणार असल्याचेही कॉंग्रेस नेत्यांनी सांगितले. म्हापशातील जनतेने आता भाजप सरकारला घरी पाठवून काॅंग्रेसला एक हाती सत्ता येण्यासाठी सहकार्य करावे, असे पी. चिदंबरम म्हणाले.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com