सांगेतील मासळी विक्रेत्यांच्या भूमिकेचा विचार करा; नगरसेवक मेशू डिकॉस्ता यांची मागणी

सुकी मासळी विक्री हे सांगेतील फेस्ताचे वैशिष्ट्य असून खेड्यापाड्यातून मासळी खरेदी विक्रीसाठी लोक येतात.
Dried Fish
Dried FishFile Photo

Sanguem News: सांगेच्या वार्षिक फेस्तानिमित्ताने भरणाऱ्या फेरीत गेल्या वर्षी सांगे पालिका मंडळाने सुकी मासळी विक्रेत्यांना मध्यवर्ती ठिकाणी मासळी विक्री केल्यास लोकांना मासळीचा वास सहन करावा लागतो, काहींना चारचाकी, दुचाकी घेऊन फिरण्यासाठी अडथळा निर्माण होतो, अशा प्रकारच्या हरकत घेऊन कोणतीही पूर्व कल्पना न देता मासळी विक्रेत्यांना उपजिल्हाधिकारी कार्यालयाच्या पाठीमागे स्थलांतर करण्यात आले असता मासळी विक्रेते नाराजी व्यक्त करीत आहेत. नगरसेवक मेशू डिकॉस्ता यांनी मात्र मासळी विक्रेत्यांच्या भूमिकेला पाठिंबा व्यक्त केला.

Dried Fish
Ponda Municipal Council: निवडणुकीनंतरही फोंड्यातील राजकारण ‘तेज’; भाजपात अस्वस्थता

सुकी मासळी विक्री हे सांगेतील फेस्ताचे वैशिष्ट्य असून खेड्यापाड्यातून मासळी खरेदी विक्रीसाठी लोक येतात. इतकेच नसून गेली कित्येक वर्षे त्याच ठिकाणी मासळी विक्री केली जात असताना अचानक कोणाला तरी मासळीचा वास येत, म्हणून फेस्तानिमित्ताने बाजार हलवल्याने विक्रेत्यांचे नुकसान होते. आपली दुकाने थाटणाऱ्या दुकानदारांना गेल्या वर्षी जे नुकसान सहन करावे लागले, तसे यंदा होऊ नये, विक्रेत्यांच्या मताचाही विचार करावा, असे मत नगरसेवक मेशू डिकॉस्ता यांनी व्यक्त केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com