आसगावात झाडांच्या कत्तलीचे षडयंत्र उघड, बिल्डर लॉबीची करामत

जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार, ग्रामस्थांमध्ये संताप
आसगावात झाडांच्या कत्तलीचे षडयंत्र उघड, बिल्डर लॉबीची करामत
Conspiracy to cut down trees in North Goa exposedDanik Gomantak

कळंगुट : स्थानिकांना अंधारात ठेवून आसगावात शेकडो झाडांची कत्तल करण्याचे मोठे षडयंत्र उघडकीस आले आहे. परप्रांतीय बिल्डर लॉबीचा हा डाव हाणून पाडण्यासाठी स्थानिक एकत्र आले आहेत. बार्देशातील फुलांचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निसर्गसंपन्न आसगावांवर आता बिल्डर लॉबीची दुष्ट नजर पडू लागली आहे. येथील वोळांत परिसरात बिल्डर लॉबीकडून नवीन वसाहतीच्या उभारणीसाठी जुन्या शंभरेक झाडांची कत्तल करण्यासाठी झाडांची नोंदणी (मार्किंग) करण्यात आल्याची माहिती आंबेडकरनगर येथील रहिवासी तथा सामाजिक कार्यकर्ते चंदन मांद्रेकर यांनी पत्रकारांना दिली. (Conspiracy to cut down trees in North Goa exposed)

Conspiracy to cut down trees in North Goa exposed
घरच्यांनी नाकारल्याने वृद्ध फुटपाथवर, भिकाऱ्यांसह स्थानिकांवर भीक मागण्याची वेळ

वोळांत येथील सर्वे क्र. 176/16 येथील खासगी जागेतील आंब्याची फळे देणारी शेकडो झाडे कत्तल करण्यासाठी अज्ञातांकडून मोजमाप करून झाडांवर क्रमांक घालण्यात आल्याची माहिती मांद्रेकर यांनी दिली. स्थानिक रहिवासी अशोक बांदोडकर म्हणाले, परप्रांतीय बिल्डर लॉबीकडून झाडांची कत्तल स्थानिक कदापि सहन केली जाणार नाही. झाडांची कत्तल रोखण्यासाठी चंदन मांद्रेकर यांच्या पुढाकाराने रस्त्यावर उतरण्याचाही इशाराही ज्येष्ठ नागरिक मान्युअल ब्रागांझा आणि अशोक बांदोडकर यांनी दिला.

जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

बिल्डर लॉबीकडून या भागात होऊ घातलेल्या शेकडो झाडांची कत्तल रोखण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते चंदन मांद्रेकर तसेच ग्रामस्थांनी उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालय, वन खाते, तसेच हणजूणच्या पोलिस स्थानकात तक्रार नोंदवली आहे. या प्रकाराची वन मंत्री विश्वजीत राणे यांनीही दखल घ्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.