गोव्यात संविधान दिन साजरा...

दैनिक गोमंतक
गुरुवार, 26 नोव्हेंबर 2020

संविधान दिनानिमित्त आज गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी समस्त कार्यकारी आणि अधिकाऱ्यांसोबत भारातीय संविधानाचे वाचन केले.

 पणजी : संविधान दिनानिमित्त आज गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी समस्त कार्यकारी आणि अधिकाऱ्यांसोबत भारातीय संविधानाचे वाचन केले. संविधानाचा स्वीकार करुन 71 वर्ष पूर्ण झाली आहेत

संविधान दिन किंवा राष्ट्रीय विधी दिन  म्हणून  २६ नोव्हेंबर हा दिवस भारतभर साजरा केला जातो. २९ ऑगस्ट १९४७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी मसूदा समिती स्थापन झाली होती.

अनेक बैठका व चर्चासत्रांनंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने स्वीकारला. त्सामुळे २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो.  भारतीय संविधान आणि घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सन्मानार्थ भारतीय संविधान दिन साजरा केला जातो.

नागरिकांमध्ये संविधानाच्या मूल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी 19 नोव्हेंबर 2015 रोजी केंद्रीय सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालयाने दरवर्षी 26 नोव्हेंबरला 'संविधान दिवस' साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे देशात 26 नोव्हेंबरला संविधान दिन साजरा केला जातो.

या प्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मरण करत, मुख्यामंत्री सावंत यांनी संविधान वाचायला सुरवात केली. आणि राष्ट्रगीताने या कार्यक्रमाची सांगता झाली.

 

संबंधित बातम्या