Goa News: खांबांवरील पश्‍चिम बगलमार्गासाठी आमदाराने आपले ‘वजन’ वापरावे!

पश्‍चिम बगलमार्ग खांबांवर पाहिजे म्हणून पंचायतीने न्यायालयात जायला हवे. पंचायत वेळकाढू धोरण अवलंबत आहे, असा आरोप आमदार व्हिएगस यांनी केला होता.
Goa News|Road
Goa News|Road Dainik Gomantak

Goa News: बाणावलीचे आमदार व्‍हेंझी व्हिएगस यांनाही पश्‍चिम बगलमार्ग खांबांवर हवा आहे. त्‍यासाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करावी. या कामासाठी त्‍यांना राजी करावे. पंचायत याप्रकरणी न्यायालयात जाण्यास उशीर का करते असे म्हणण्यापेक्षा त्यांनीच सरकारला त्यासाठी राजी करावे. त्यामुळे न्यायालयीन खर्चही वाचेल, असा सल्ला बाणावलीचे सरपंच शावियेर परेरा यांनी दिला आहे.

न्यायालयात केव्हा जावे लागते, जेव्हा एखादी समस्या आमदार किंवा सरकार दरबारी सुटत नसेल तेव्हाच. येथे तर आमदार व्‍हेंझी यांनाही पश्‍चिम बगलमार्ग खांबांवरून पाहिजे आहे. ज्यांना हा प्रश्र्न न्यायालयात जाऊन सोडवायचा असेल त्यांनी स्वत:च्‍या खर्चाने खुशाल न्यायालयात जावे. त्‍यासाठी पंचायतीला दोष देऊ नये, असे परेरा म्‍हणाले.

पश्‍चिम बगलमार्ग खांबांवर पाहिजे म्हणून पंचायतीने न्यायालयात जायला हवे. पंचायत वेळकाढू धोरण अवलंबत आहे, असा आरोप आमदार व्हिएगस यांनी केला होता.

नावेली, मुंगूल व सुरावलीला खांबांवरुन रस्ता का मिळाला, तर तेथील आमदारांनी सरकार दरबारी प्रयत्न केले. त्‍या पंचायतींना न्यायालयात जावे लागले नाही. आमच्‍या आमदाराने कसा काहीच प्रयत्‍न केला नाही, असा आरोप परेरा यांनी केला.

Goa News|Road
धक्कादायक! गोव्यातील आग्वाद किल्ल्यात मद्यविक्री; आप म्हणतंय, हेच विकासाचं मॉडल?

पंचायत सदस्यांनी जानेवारीत तर नंतर आपण स्वत: आमदार व्‍हेंझी यांची भेट घेऊन परिस्थितीची जाणीव त्यांना करून दिली होती. त्यानंतर विधानसभेचे अधिवेशन झाले. अधिवेशनात हा प्रश्र्न उपस्थित झाला.

त्याची कागदपत्रे आपण देऊ असे आमदार व्‍हेंझी यांनी सांगितले होते. मात्र त्‍यांनी अजूनही आमच्याशी संपर्क साधलेला नाही. तसेच त्‍यांनी शेतकऱ्यांनासुद्धा न्यायालयात जाऊ दिले नाही. ज्‍या प्रकारे ते पंचायतीवर दबाव टाकू पाहत आहेत, ते पाहता या प्रश्र्नाची गंभीरताच ते नष्ट करू पाहत आहेत असे आपल्याला वाटते, असे सरपंच परेरा यांनी सांगितले.

Goa News|Road
Goa News: पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करत रानगव्याने मांडला उच्छाद

सुरावली ग्रामसभेत ठराव संमत

पश्‍चिम बगलमार्ग खांबांवरच उभारावा अशी मागणी करणारा ठराव काल रविवारी सुरावली ग्रामसभेत संमत करण्यात आला. सुरावली-मुंगूल रेल्वे पुलाचे कामसुद्धा लवकरात लवकर पूर्ण करावे. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याला निवेदन सादर करावे, असेही ग्रामसभेत ठरविण्यात आले. अध्यक्षस्थानी सरपंच सीमा शंके होत्या.

पावसाळ्यात पूरग्रस्त स्थिती टाळण्यासाठी रस्ता खांबावर हवा असे सर्वसाधारण मत यावेळी व्यक्त करण्यात आले. सुरावली भागातील पश्र्चिम बगलमार्ग खांबांवरच उभारण्याचा निर्णय घेतला आहे व काम जोरात चालू आहे.

त्याबद्दल सरकारचे अभिनंदन करणारा ठरावही संमत करण्यात आला. त्याचबरोबर नावेली, बाणावली येथील भागही खांबांवर उभारावा. कारण तेथील पूरग्रस्त परिस्थितीचा परिणाम परिसरातील सर्वांना भोगावा लागणार आहे, असे मतही ग्रामस्थांनी व्यक्त केले. या ग्रामसभेत 2023-24 सालच्‍या अंदाजपत्रकावरही चर्चा करण्यात आली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com