मेळावलीतील आयआयटी गोव्याच्या बांधकामाला महिनाभरात सुरूवात होणार ; 2023 पर्यंत 1200 विद्यार्थ्यांसाठी होणार उपलब्ध

वृत्तसंस्था
रविवार, 3 जानेवारी 2021

मेळावली, सत्तरीतील नागरिकांचा विरोध असतानाही येत्या 15 जानेवारीपर्यंत आयआयटी कॅम्पससाठी जागेचे सीमांकन करण्याचे निर्देश दिले आहेत.

पणजी : मेळावली, सत्तरीतील नागरिकांचा विरोध असतानाही येत्या 15 जानेवारीपर्यंत आयआयटी कॅम्पससाठी जागेचे सीमांकन करण्याचे निर्देश दिले आहेत. आयआयटी गोव्याचे संचालक बी. के. मिश्रा यांनी एक निवेदन प्रसिद्ध केलेल्या निवेदनात, येत्या 15 जानेवारीपर्यंत आयआयटी कॅम्पससाठी जागेचे सीमांकन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले आहेत. तसंच, जागेजवळ पोलिस चौकी उभारण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या असल्याचे सांगण्यात आले.

शुक्रवारी सकाळी सावंत यांनी आयआयटी गोव्याच्या अधिकाऱ्यांसमवेत प्रकल्पाच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी घेतलेल्या बैठकीनंतर हे निवेदन करण्यात आले. आयआयटी गोव्याच्या संचालकाने असे सांगितले की कायमस्वरुपी कॅम्पससाठी डिझाईन आधीच तयार आहेत. मिश्रा यांनी नमूद केले की १,२०० विद्यार्थ्यांसाठीच्या कॅम्पसचा पहिला टप्पा ऑक्टोबर 2023 पर्यंत तयार होईल. बांधकाम परवानग्या मिळताच प्रकल्पाचे काम एका महिन्याच्या आत सुरू होईल, असंदेखील ते म्हणाले.
 

संबंधित बातम्या