बांधकाम साहित्य चोरणं महागात पडलं

दोन युवकांना अटक; एका अल्पवयीन संशयिताची रवानगी सुधारगृहात
बांधकाम साहित्य चोरणं महागात पडलं
Theft in GoaDainik Gomantak

म्हापसा : कोलवाळ पुलाजवळील राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम साहित्य चोरल्याप्रकरणी पोलिसांनी अर्जुन पवार (20, रा. थिवी) आणि बिशाल प्रसाद (20, गावसावाडा-म्हापसा) या दोघा संशयितांना गुरूवारी अटक केली आहे. तर एका अल्पवयीन संशयिताची रवानगी सुधारगृहात केली. सदर प्रकार गुरुवारी पहाटे 2.30 च्या सुमारास घडला.

कोलवाळ पोलिसांच्या माहितीनुसार, गस्तीवरील पोलिसांना पाहून वरील तिघांनीही दुचाकीवरून धूम ठोकली. तेव्हा त्यांच्या दुचाकीचा घसरून अपघात घडला. तिघांपैकी एकाने तिथून पळ काढला. मात्र, नंतर पोलिसांनी या तिघांनाही पकडले.

संशयित राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणासाठी आणि नवीन कोलवाळ पुलाच्या बांधकामासाठी ठेवलेले साहित्य चोरत असल्याची माहिती या तपासात समोर आली. संशयित लोखंडी सळ्या व सिमेंटच्या पिशव्या चोरत होते.

Theft in Goa
मस्ती अंगलट! हणजूण किनारी कार फसली

याप्रकरणी कंत्राटदार एमव्हीआर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी कोलवाळ पोलिसांत तक्रार दाखल दिली आहे. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी संशयितांविरुद्ध गुन्हा नोंदवून अटक केली.

कोलवाळ पोलिस उपनिरीक्षक मंदार परब, हवालदार महादेव परब, सुनिल मांद्रेकर, रामा नाईक, सुधीर परब व सुलेश नाईक या पथकाने ही कारवाई केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com