गोवा शिपयार्ड लिमिटेडकडून नौदल सिम्युलेटरच्या उभारणीस सुरूवात

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 19 फेब्रुवारी 2021

नौदलाच्या क्षमतेत वाढ कऱण्यासठी गोवा शिपयार्ड लिमिटेडने ( जीएसएल ) पोर्ट ब्लेअर येथे अंदमान निकोबार कमांडसाठी डॅमेज कंट्रोल सिम्युलेटर बांधण्यास सुरवात केली आहे.

पणजी : सागरी सीमांवरील आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यास जवानांना प्रशिक्षण देण्याच्या भारतीय नौदलाच्या क्षमतेत वाढ कऱण्यासठी गोवा शिपयार्ड लिमिटेडने ( जीएसएल ) पोर्ट ब्लेअर येथे अंदमान निकोबार कमांडसाठी डॅमेज कंट्रोल सिम्युलेटर बांधण्यास सुरवात केली आहे. ऑगस्ट 2020 मध्ये भारतीय नौदल आणि जीएसएलने सिम्युलेटरसाठी औपचारिकपणे करार केला होता. जीएसएल सशस्त्र दलांसाठी तयार करत असलेले हे हे सातवे सिम्युलेटर आहे. सिमुलेटर सागरी सीमांचे रक्षण करणाऱ्या जवानांना आग,जहाजात पाणी भरणे अशा विविध आपत्कालीन परिस्थितींसाठी प्रशिक्षण देणार आहे. 

गोव्याचा कुख्यात गुंड अन्वर शेखवर 'बदले की आग में' झाला हल्ला

या सिम्युलेटरमध्ये 19 कम्पार्टमेन्ट्स असतील आणि ते पाच वेगवेगळ्या नुकसान नियंत्रण प्रशिक्षणासाठी वापरले जातील. एका वेळी सुमारे 24 नौदल जवानांना प्रशिक्षण दिले जाऊ शकते,अशी माहिती सूत्रांनी दिली.अंदमान निकोबार कमांडर-चीफ कमांडर लेफ्टनंट जनरल मनोज पांडे आज या प्रकल्पाची पायाभरणी करतील. हे डॅमेज कंट्रोल सिम्युलेटर जहाजाच्या हालचाली, कंपार्टमेंट मध्ये पाणी भरणे, विद्युत उर्जा व यंत्रणेचे अपयश यांचा अभ्यास व यावरील संशेधनास बळकटी देईल. 

गोव्याच्या उपमुख्यमंत्र्यांना दाखवणार पेडणेवासीय जागा

ही मूलत: एक प्रशिक्षण प्रणाली आहे जी जहाजांचे नुकसान नियंत्रण आणि दुरुस्तीच्या प्रशिक्षण शिबिरांसाठी वास्तववादी आणि तणावपूर्ण परंतु नियंत्रित वातावरणात जवानांना प्रशिक्षण देईल.“अशाच परिस्थितीत प्रशिक्षण घेतलेले जवान  कार्यक्षमतेने, कौशल्याने व आत्मविश्वासाने काम करण्यासठी सक्षम होतील", असे एका नौदल अधिकाऱ्याने सांगितले. आतापर्यंत, जीएसएलने सहा सिम्युलेटर तयार केले आहेत आणि नुकतेच शेजारच्या देशात डॅमेज कंट्रोल सिम्युलेटरची  यंत्रणा निर्यात केली आहे.

संबंधित बातम्या