Goa: काणकोण पालिका भवनाचे बांधकाम येत्या महिन्यांपासून सुरू

प्रकल्पाला जोडूनच मागच्या बाजूला काणकोण (canacona) पालिकेची कचरा उचल वाहने,यंत्र सामुग्री,कामगार विश्रांती कक्ष उभारण्यासाठी पालिका मंडळाने प्रस्ताव पाठविला आहे.
काणकोण पालिका भवन
काणकोण पालिका भवनDainik Gomantak

काणकोण: काणकोण (Canacona) पालिका भवनाचे बांधकाम येत्या महिन्यांपासून सुरू करण्यात येणार आहे.सुडा योजनेतून हा प्रकल्प उभारण्यात येणार त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी (Chief Minister) दहा कोटी रूपयांची वित्तीय मंजुरी या प्रकल्पाला दिली आहे.भवन प्रकल्पाच्या उभारणीची वर्क ऑर्डरही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे असे उपसभापती इजिदोर फर्नांडीस यांनी सांगितले. पालिकेची जुनी इमारत मोडून हा दुमजली प्रकल्प उभारण्यात येणार आहे. (Construction of 'Kankon Palika Bhavan' will start from next month)

नगरविकास मंत्री मिलिंद नाईक यांनी या प्रकल्पाची पायाभरणी केली होती तेव्हापासून प्रकल्प चर्चेत होता.गेल्या पालिकामंडळानेे तत्कालीन नगराध्यक्ष नितू समीर देसाई याच्या पुढारपणाखाली पालिका भवनाचा प्रस्ताव तयार केला होता.गेल्या कॅबिनेट बैठकीत या प्रस्ताची फाईल नगरविकास मंत्री मिलिंद नाईक यांनी ठेवून तिला समंती मिळवली मुख्यमंत्र्याना विनंती केल्यावर त्यांनीही प्रकल्पाला वित्तीय मंजूरी दिली त्याबद्धल मुख्यमंत्री व नगरविकास मंत्र्याना त्यांनी धन्यवाद दिले आहेत.

दरम्यान, तळमजला व वर दोन मजले असे भवनाचे स्वरूप राहणार आहे.त्यामध्ये कार्यालयीन कक्ष, नगरसेवक कक्ष,परिषदगृह,सभागृह व अन्य सुविधा असतील.जुन्या पालिका इमारतीत नगरसेवकाना बसण्यासही स्वतंत्र जागा नव्हती. पालिका क्षेत्राची लोक संख्या वाढत आहे त्याप्रमाणे कार्यालयीन कामकाजही वाढत आहे.त्यामुळे प्रशस्त पालिका भवन ही काळाची गरज होती.

काणकोण पालिका भवन
Goa: "अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कृषी व्यवसायाकडे वळा"

या प्रकल्पाला जोडूनच मागच्या बाजूला पालिकेची कचरा उचल वाहने,यंत्र सामुग्री,कामगार विश्रांती कक्ष उभारण्यासाठी पालिका मंडळाने प्रस्ताव पाठविला आहे त्यालाही सरकाची समंती मिळवून दोन्ही प्रकल्प एकाच वेळी पूर्ण करण्यात येणार असल्याचे उपसभापती फर्नांडीस यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com