Goa Road Condition: खांबांवरील रस्‍त्‍याचे बांधकाम अखेर सुरू

पश्‍चिम बगलमार्ग : बाणावलीचा निर्णय अधांतरीच
Road Condition
Road ConditionDainik Gomantak

सासष्टी: पश्र्चिम बगल रस्त्यावरील 2.75 किलोमीटरपैकी सुरावली ते मुंगूल पुलापर्यंतच्या 980 मीटर लांबीच्या खांबावरील रस्ता बांधकामाला अखेर सुरूवात झाली आहे. ग्रामस्थांनी त्यासाठी आंदोलनही केले होते. शिवाय राष्ट्रीय हरित लवादाला हस्तक्षेप करून दहा सदस्यांची समिती नियुक्त करावी लागली होती. उच्च न्यायालयानेही या भागातील रस्ता खांबावर उभारणीसाठी आदेश दिला होता. दरम्‍यान, बाणावली भागातील खाबांवरील रस्त्याचा निर्णय अधांतरीच आहे. जलस्त्रोत खात्याने हा रस्ताही खांबावर असावा अशी शिफारस केली आहे. पण सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार जलस्त्रोत खात्याच्या शिफारसीची त्यांना कल्पना नाही.

(construction of the 980 meter long pillar road from Surawali to Mungul bridge has finally started)

Road Condition
Mandrem Sarpanch: मांद्रेच्या सरपंचपदी ॲड. अमित सावंत बिनविरोध

सध्‍या सुरू असलेल्या सुरावली ते मुंगूल पुलापर्यंतच्या खांबावरील रस्त्यामुळे दोन्ही बाजूच्या शेतात पाणी साचणार नाही. तसेच साळ नदीच्या प्रवाहातही खंड पडणार नाही अशी अपेक्षा आहे. हे काम सध्‍याच्‍या कंत्राटदारावरच सोपविल्याचे सार्वजनिक बांधकाम खात्यातील एका अधिकाऱ्याने सांगितले. हा रस्ता ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होणार होता. उच्च न्यायालयानेही हे काम निर्धारीत वेळेत पूर्ण करावे असे बजावले होते.

तब्‍बल ७०.५३ कोटींचा खर्च वाढणार

खांबांवरील रस्‍त्‍याच्‍या कामामुळे पश्र्चिम बगल रस्त्यावरील खर्च वाढणार आहे. पूर्वी त्‍यासाठी १४८.४१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. आता खांबांवरील रस्त्यामुळे आणखी ७०.५३ कोटी रुपयांच्या खर्चाचे ओझे सरकारला उचलावे लागणार आहे. मात्र या ज्यादा खर्चामुळे शेतजमीन सुरक्षित राहील व साळ नदीच्या प्रवाहाला धोका पोहोचणार नाही असे दहा सदस्यीय समितीतील एका सदस्याने सांगितले.

बाणावलीवासीय पुन्‍हा करणार आंदोलन?

पश्र्चिम बगल रस्त्यावरील सुरावली ते मुंगूल पुलापर्यंतच्या खांबावरील रस्ता कामाला प्रारंभ झाल्‍यामुळे आता बाणावलीचे ग्रामस्थही पुढे सरसावणार आहेत. खांबांवर रस्‍ता बांधावा अशी त्‍यांचीही मागणी आहे. त्‍यामुळे पुन्‍हा एकदा आंदोलन भडकण्‍याची शक्‍यता नाकारता येत नाही. दुसरीकडे पश्र्चिम बगलमार्ग पूर्ण करण्याच्या कामात आणखी अडथळे निर्माण होणार नाहीत याची सरकारला दक्षता घ्यावी लागणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com