बांधकाम व्यवसायावर परिणाम

construction
construction

मडगाव

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गोव्यातील मजुरांनी आपल्या गावी स्थलांतर केल्याने बांधकाम व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. जोडीला रेतीची टंचाई व सिमेंटचा वाढलेला दर यामुळे बांधकाम व्यावसायिकांना आर्थिक अडचणींचाही सामना करावा लागत आहे.
बांधकाम व्यवसाय सध्या जवळपास पूर्णपणे ठप्प झाला आहे. मजूर हा बांधकाम व्यवसायातील महत्त्वाचा घटक आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मजुरांनी आपल्या गावी स्थलांतर केल्याने बांधकाम व्यवसाय कोलमडला आहे. काही प्रमाणात उपलब्ध असलेले मजूर तेजी दाखवत असून आपल्या मर्जीनुसारच काम करण्याचा पवित्रा या मजुरांनी घेतला आहे. एकंदर बांधकाम व्यवसायाला मोठा फटका बसला आहे, असे बांधकाम व्यावसायिक डॉ. देश प्रभुदेसाई यांनी सांगितले.
गोव्यात कुशल कामगार उपलब्ध आहेत. या कामगारांनी स्थलांतर केलेले नाही. कुशल कामगारांचा वर्ग गोव्यात स्थायिक झाला आहे. त्यांची मुलेही येथे शिक्षण घेत आहेत. त्यामुळे हा वर्ग आपल्या गावी गेला नाही. पण, हरकामे मजूर गावी गेल्याने बांधकामे सुरू करता येत नाहीत, असे प्रभुदेसाई यांनी सांगितले.
गावी गेलेले मजूर लवकर परत येण्याची शक्यताही कमीच आहे. ते परत आले तरी त्यांना कोरोना चाचणी व विलगीकरण प्रक्रियेतून जावे लागणार असल्याने त्यातही वेळ जाणार आहे. बंगळूर, हैद्राबाद यासारख्या शहरात रोजगार मिळाल्यास हे मजूर तिथे वळण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे बांधकाम व्यवसायाला पुढील काळ कठीण असेल असे प्रभुदेसाई यांनी सांगितले .
मजूर गावी गेल्याने बांधकाम व्यवसायावर सुमारे ७० टक्के परिणाम झाला आहे व रेतीची टंचाई तसेच सिमेंटच्या दरात झालेली २५ टक्के दरवाढ याचाही फटका बसला आहे, सिमेंटचा दर प्रतिबॅग ३२० रुपयांवरून ४१० रुपयांवर गेला आहे, असे बांधकाम व्यावसायिक सावियो कुतिन्हो यांनी सांगितले.
गेलेले मजूर पुन्हा लवकर येण्याची शक्यता नाही. मजूर गेलेल्या राज्यातील परिस्थिती निवळली तरच ते पुन्हा येतील. मनुष्यबळाच्या टंचाईवर उपाय म्हणून यांत्रिकीकरणाचा पर्याय बांधकाम व्यावसायिकांना ठेवावा लागणार आहे. कमी मनुष्यबळ लागणारी यंत्रणा बांधकाम व्यावसायिकांनी उभी करावी लागेल, असे कुतिन्हो यांनी सांगितले

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com