गोवा: वाढत्या कोविड रुग्णांच्या पार्श्वभूमीवर संपर्कमुक्त प्रचार

दैनिक गोमंतक
बुधवार, 31 मार्च 2021

कोविड रुग्णांच्या संख्येत होत असलेल्या वाढीची दखल घेऊन संपर्कमुक्त निवडणूक प्रचार मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे.

मडगाव : पालिका निवडणुकीसाठी मडगाव शेडो कौन्सिलने आपले सहा उमेदवार जाहीर केले असून कोविड रुग्णांच्या संख्येत होत असलेल्या वाढीची दखल घेऊन संपर्कमुक्त निवडणूक प्रचार मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे.(Contact-free propaganda on the background of increasing covid patients) 

 प्रभाग 20 मध्ये शेडो कौन्सिलच्या कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत कौन्सिलचे निमंत्रक व माजी नगराध्यक्ष सावियो कुतिन्हो यांनी ही माहिती दिली. यावेळी शेडो कौन्सिलच्या उमेदवार अॅड सेऊला वाझ (प्रभाग 3), मानुएल ओलिवेरा (प्रभाग 9), व्लेम फर्नांडिस (प्रभाग 12), अॅड. स्नेहल वसकर (प्रभाग 13), वेरन डिसिल्वा (प्रभाग 15), पोमा केरकर (प्रभाग 20) उपस्थित होत्या. 

शेडो कौन्सिलचे समर्थन लाभलेल्या आणखी उमेदवारांची नावे लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. या उमेदवारांना इतर समाजिक संस्थांचाही पाठिंबा असेल असे कुतिन्हो यांनी सांगितले. 

राज्यात कोविड (Covid-19) रुग्णांची संख्या वाढत असल्याने जनतेच्या आरोग्य सुरक्षेसाठी संपर्कमुक्त प्रचार (Election Campaign) मोहीम राबवण्याचा निर्णय शेडो कौन्सिलने घेतला आहे. प्रचारात जास्त लोकांना सहभागी करून घेण्यात येणार नाही. शेडो कौन्सिलचे उमेदवार स्वतःसह केवळ पाच जणांचे पथक करून प्रचार करतील, असे कुतिन्हो यानी सांगितले. 

संबंधित बातम्या