Accident: आमोणा येथील विद्युत वाहिनीवर कंटेनर आदळून अपघात, सत्तरीत बत्ती गुल

Accident: आमोणा येथील विद्युत वाहिनीवर कंटेनर आदळून अपघात, सत्तरीत बत्ती गुल
Dainik Gomantak

आमोणा येथील विद्युत वाहिनीवर कंटेनर आदळून अपघात झाला आहे. यामुळे 33KV विद्युत वाहिनी तुटली असून, सत्तरीतील (Sattari) वीज पुरवठा खंडित झाला आहे. तुटलेल्या विद्युत वाहिनीची दुरूस्ती करून आज वीज पुरवठा सुरळीत होण्याची शक्यता आहे. शुक्रवारी उशीरा रात्री हा अपघात झाला. कंटेनरवरचा चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याची शक्यता स्थानिक नागरिकांनी वर्तवली आहे.

बाराजण-उसगावात तीन वाहनांचा विचित्र अपघात, दोघे जखमी

बाराजण - उसगाव येथे शुक्रवारी (दि. 29) तीन वाहनांच्या अपघातात दोघेजण किरकोळ जखमी झाले. हा अपघात सकाळी सव्वादहाच्या सुमारास घडला. कर्नाटक राज्यातील मालवाहू ट्रक तसेच गोव्यातील कारगाडीच्या अपघातात, दुचाकीला ट्रक व कारगाडीची ठोकर बसण्याची शक्यता होती. दुचाकीचालकाने गाडी सोडून बाजूला उडी घेतल्याने तो बचावला, अन्यथा दुचाकीस्वाराच्या प्राणावर बेतले असते.

Accident: आमोणा येथील विद्युत वाहिनीवर कंटेनर आदळून अपघात, सत्तरीत बत्ती गुल
गोव्यात आता वेग मर्यादेसाठी कायद्यात दुरुस्ती करणार

झुआरी अपघात : गाडीने जाणे टाळल्याने हेल्टन बचावला!

काळ आला होता, पण वेळ आली नव्हती या वाक्याचा प्रत्यय नुकताच आला. झुआरी पुलावरील दुर्घटनेत चौघांना जलसमाधी मिळाली. मात्र, त्यांच्यासोबत गाडीने न गेल्याने लोटली येथील हेल्टन फर्नांडिस हा त्याचे दैव बलवत्तर म्हणून बचावला. अपघात होण्यापूर्वी चौघेही घरी बर्थ डे पार्टी केल्यानंतर ते पणजीत पार्टी करण्यासाठी जात होते व त्याला बोलावत होते. मात्र हेल्टन यांनी नकार दिला अशी माहिती पोलिसांनी त्याची नोंद केलेल्या जबानीत उघड झाली आहे.

Accident: आमोणा येथील विद्युत वाहिनीवर कंटेनर आदळून अपघात, सत्तरीत बत्ती गुल
Margao : चतुर्थी काळातील सुरक्षेबाबत अधिकाऱ्यांची व्यापाऱ्यांशी बैठक

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com