Goa Water Problem : उसगाववासीयांच्या नशिबी दूषित पाणीच! ग्रामस्थांत संताप

15 दिवसांत टाकी दुरुस्ती करा, अन्यथा ‘घागर मोर्चा’
Water Problem
Water ProblemDainik Gomantak

Goa Water Problem : उसगाव - गांजेवासीयांना सध्या दूषित पाण्याचा पुरवठा केला जात असून रात्रीअपरात्री जागून गृहिणींना हे पाणी भरावे लागते. हा पाणी पुरवठा करणाऱ्या म्हारवासडा - उसगावातील टाकीची दुर्दशा झाली असून सुरळीत पाणी पुरवठा आणि टाकीची दुरुस्ती पंधरा दिवसांत झाली नाही तर गृहिणींकडून घागरमोर्चा काढू, असा इशारा उसगाववासीयांनी दिला आहे.

रविवारी उसगाव - गांजे पंचायतक्षेत्रातील काही जागृत नागरिकांनी पंचसदस्य संजय गावडे, विनोद मास्कारेन्हस तसेच राजेंद्र नाईक यांच्यासमवेत दाग - फोंड्यातील पाणी पुरवठा खात्याच्या कार्यालयावर धडक देऊन संबंधित अधिकाऱ्याला जाब विचारला.

Water Problem
सनबर्न ध्वनी प्रदूषण चौकशीत सारवासारव; अहवाल द्या

यावेळी गुरुदास गाड, शांताराम नाईक, मुकुंद गावडे, मुकेश गावडे तसेच इतर नागरिकांचा समावेश होता.

उसगावात पाणी पुरवठा करणाऱ्या टाकीची दैना झाली असून या टाकीला गळती लागली आहे. त्यातच जीर्ण झालेल्या टाकीचे झाकण मोडकळीस आले असून ते उघडेच आहे. टाकीतील पाण्याची स्वच्छता करण्यासाठी लावलेली शिडी मोडलेली आहे, आणि उघड्या टाकीमुळे पक्ष्यांची विष्ठा या टाकीत पडत असल्याने गंभीर प्रश्‍न निर्माण झाला आहे. अधिकाऱ्यांनी तातडीने प्रश्‍न सोडवू,असे सांगितले.

Water Problem
Panaji Smart City : ‘स्मार्ट' पणजीची रोजच ‘कोंडी’ ! सुटका कधी ?

सुधारणाच नाही...!

उसगाव - गांजे भागातील पाणी पुरवठ्यात कोणतीच सुधारणा झालेली नाही. रात्री पाणी सोडले जाते, त्यामुळे जागून महिलांना हे पाणी भरावे लागते. विशेष म्हणजे जवळच गांजे येथे प्रकल्प आहे, पण हे पाणी थेट ओपा प्रकल्पात सोडले जात असले तरी उसगाववासीयांना पाण्यासाठी भटकावे लागते. मंत्री विश्‍वजीत राणे यांनी यात लक्ष घालावे,अशी मागणीही नागरिकांनी केली आहे

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com