बायणा परीसरात घाऊक मासळी विक्रीला पोलिसांनी कोणत्या आधारावर परवानगी दिली?

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 17 नोव्हेंबर 2020

वास्को शहरात ठिकठिकाणी मासळी विक्री करणाऱ्यांना वास्को पोलिस अटकाव करीत आहेत पण, बायणा उड्डाणपुलाच्या खाली बिनधास्तपणे मासळी विक्री केली जाते त्याला वास्को पोलिसांची मान्यता आहे

 मुरगाव: वास्को शहरात ठिकठिकाणी मासळी विक्री करणाऱ्यांना वास्को पोलिस अटकाव करीत आहेत पण, बायणा उड्डाणपुलाच्या खाली बिनधास्तपणे मासळी विक्री केली जाते त्याला वास्को पोलिसांची मान्यता आहे याबद्दल नागरिकांतून पोलिसांबद्दल उलटसुलट प्रतिक्रिया  व्यक्त केली जात आहे.

  वास्कोतील मासळी विक्रेत्या महिलांनी शहरात ठिकठिकाणी घाऊक पद्धतीने होणारी मासळी विक्री अगोदर बंद करावी त्यानंतरच शहरातील मासळी मार्केट प्रकल्प उभारण्यासाठी सहाय्य करू असे पालिका आणि वास्को आमदार कार्लूस आल्मेदा यांना बजावून सांगितल्याने वास्को पोलिसांच्या मदतीने शहरातील घाऊक मासळी विक्री बंद केली आहे.गेल्या महिनाभरापासून वास्को शहरात घाऊक मासळी विक्री बंद आहे पण शहराला लागून असलेल्या बायणा भागात बिनधास्तपणे ही विक्री चालू आहे.वास्को पोलिसांच्या हद्दीत बायणा परीसर येत असून तेथे घाऊक मासळी विक्रीला पोलिसांनी कोणत्या आधारावर परवानगी दिली आहे असा सवाल नागरिक तसेच वास्को शहरातील घाऊक मासळी विक्रेते विचारीत आहे.

  काटेबायणा ते देस्तेरो पर्यंतच्या चौपदरी महामार्गाच्या उड्डाणपुलाखाली दरदिवशी मोठ्या प्रमाणात बिनधास्त आणि बेकायदेशीर पणे घाऊक पद्धतीने मासळी विक्री केली जात आहे.बायणात मासळी मार्केट आहे तेथेही रस्त्यावर तसेच सासमोळे येथे जाणाऱ्या रस्त्यावर मासळी विक्री केली जात आहे.मात्र पोलिस अटकाव करीत नाही याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 

संबंधित बातम्या