सांग्यातील कंत्राटी कामगार आंदोलनाच्या पवित्र्यात

Dainik Gomantak
मंगळवार, 26 मे 2020

गेली चार वर्षे आम्ही या कंपनीत रोजंदारीवर काम करत आहोत. टाळेबंदीचा मुद्दा समोर आणून कंपनी आस्थापनाने आम्हाला टाळेबंदीनंतर कामावर बोलवू असे आश्वासन दिले होते.

सांगे 

सांगे शेळपे येथील औद्यौगिक वसाहतीत असलेल्या वरुण बिवरेजीस या पेप्सी कंपनीची शितपेये उत्पादीत करणाऱ्या कंपनीने सुमारे १३० कामगाराना घरी बसविल्याने कामगार वर्गाने संताप व्यक्त केला आहे. आम्हाला कंपनीने पुन्हा कामावर द्यावे अशी मागणीा काही कामगारानी उपमुख्यमंत्री चंद्रकांत ऊर्फ बाबू कवळेकर यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेवून केली आहे. यावर आपण बुधवारपर्यंत यावर तोडगा काढू असे आश्वासन त्यानी दिल्याचे कामगारवर्गाने पत्रकारांकडे बोलताना सांगितले 

यावेळी बोलताना कामगार स्टीफन फर्नाडिस् म्हणाले की ' गेली चार वर्षे आम्ही या कंपनीत रोजंदारीवर काम करत आहोत. टाळेबंदीचा मुद्दा समोर आणून कंपनी आस्थापनाने आम्हाला टाळेबंदीनंतर कामावर बोलवू असे आश्वासन दिले होते. आम्ही घरी थांबल्यावर परप्रांतीय कामगारांना घेवून काम सुरू केले .जेव्हा आम्हाला हा प्रकार समजला तेव्हा आम्ही कंपनी अधिकाऱ्यांना याबाबतीत विचारणा करण्याचा प्रयत्न केला असता तुम्ही आमच्याकडे बोलू नका तुमच्या कंत्राटदाराकडे जा असे सांगण्यात आले . तेव्हा कंत्राटदाराशी संपर्क साधला तेव्हा कंत्राटदाराने आपले कंत्राट संपले असून ते नव्याने करावे लागणार, स्थानिकांना कामावर घेवू नका तसेच परप्रांतीय कामगारांना घेवून काम करणार असल्याचेही कंपनीने स्पष्ट केले होते, अशी माहिती मिळाली. हा प्रकार पाहिल्यास सांग्यातील कामगारांबर अन्याय केलेला दिसून येत आहे .टाळेबंदीत २२ते २५ एप्रिल दरम्यान सरकारने एक आदेश काढला होता की कंपन्यानी सर्व कामगारांना चार दिवसांचा पगार द्यावा तो आदेश वरूणबिवरेज कंपनीला लागू होत नाही का ? उलट कंपनी अधिकाऱ्यांशी संपर्क साधला तेव्हा तुम्हाला एक पैसाही देण्यात येणार नाही तुम्ही काय करायचे ते करा अशी उत्तरे दिली जातात . 

आम्ही फक्त आमच्या मोजक्या कामगारांसाठी लढत नसून हा प्रश्न १३० कामगारांचा पोटाचा आहे व हे कामगार सांग्यातील आहेत . उलट कंपनी काही कामगारांना हाताशी धरून आमच्या मधे फुट पाडण्याचे ,षडयंत्र रचत आहे . उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांची भेट घेवून या समस्येवर तोडगा काढावा अशी मागणी त्यांच्याकडे केलेली आहे . त्यावेळी कंपनीचेही काही प्रश्न असल्याचे कवळेकर म्हणाले . मात्र बुधवारपर्यंत यावर काही उपाय काढू असे आश्वासन त्याने दिलेले आहे . आम्ही त्याची वाट बघत आहोत .अन्यथा सर्व कामगार कंपनीच्या गेटवर बसुन राहू असेही फर्नांडिस्र म्हणाले .

 

 

संबंधित बातम्या