बेदरकार खनिज वाहतुकीवर निर्बंध

Sange Meeting
Sange Meeting

कुडचडे

सांगे, केपे व धारबांदोडा अश्या तीनही तालुक्यातील खनिज मालाची सावर्डे व कुडचडे भागात साठवणूक व निर्यात होण्यासाठी खनिज भरलेली वाहने दिवसभर वाहतूक कोंडी करीत असतात  त्याबाबत नागरिकांच्या अनेक तक्रारी येऊ लागल्याने सांगेचे उपजिल्हाधिकारी अजय गावडे यांनी खाण व्यवस्थापक,पोलीस निरीक्षक, आर टी ओ, वाहतूक पोलीस यांची संयुक्त बैठक घेतली. खाण कंपन्यांना अनेक महत्वपूर्ण सूचना करून जे कोणी सूचनांचे पालन करीत नाही त्या वाहनांना परत खनिज वाहतुकीत सामावून न घेण्याचा आदेश दिला. 

        या बैठकीला सेझा तिंबले, चौगुले, माईनस्केप आधी कंपनी अधिकारी हजर होते. उपजिल्हाधिकारी अजय गावडे या वेळी म्हणाले कि खाणीवरून सुटलेला ट्रक कोणतेही अंतर व सूचनांचे पालन करीत नाही. सामाजिक बांधीलकी विसरली जात आहे. केवळ खाण कंपनी साठी काम न करता लोकांसाठीही थोडेतरी करा असे आवाहन करीत कायदा मोडणाऱ्यांना चलन देण्यासाठी सूचना केली. खनिज वाहतूक करताना खासगी वाहनांना, दुचाकी चालकांना प्राधान्य देण्यासाठी  वाहन चालकांना सूचना देणे, तीन मिनिटाच्या अंतरात एक वाहन सोडणे, खाली ट्रक व खनिज भरलेले पावणे एकवाजता गेटमध्ये बंदिस्त करावा जेणेकरून रस्त्यावर ताण कमी पडणार अश्या सूचना करण्यात आल्या. 

 सर्वच गोष्टी पोलिसांवर अवलंबून राहू नका प्रत्येक खाण कंपनीने आपले सुरक्षा रक्षक आवश्यक त्या ठिकाणी तैनात करावे त्याच बरोबर रस्त्यावर पडलेली धूळ माती उचलण्या साठी उपाय योजना आखण्याची सूचना केली असता रस्त्यावर गटारातील माती टाकली जाते ती लवकर उचलण्यात येत नसल्याने धूळ माती सर्वत्र पसरत असते असे एका खाण व्यवस्थापकाने सांगितले. स्पीड गव्हर्नर बसवून देखील वाहने भरधाव वाहतूक करीत आहे. एखादा अपघात घडल्यास लोक रस्त्यावर उतरल्यावर सर्वच हाताबाहेर जाणार याची जाणीव ठेवणे आवश्यक असून खनिज वाहतूक करणारे ट्रक रस्त्यावर बंद पडल्यास तो त्वरित हलविण्याची जबाबदारी खाण कंपनीची आहे. वाहतूक प्रसंगी अंतर पाळले जात नाही. 

यापुढे सर्व नियमानुसार जे कोणी वाहन चालवीत नसेल त्याच्यावर कडक कारवाई करण्याचा आदेश पोलीस व वाहतूक अधिकारी तसेच वाहतूक पोलिसांना दिला आहे 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com