वादग्रस्त पोलीस अधिकारी सागर एकोस्कर यांच्या चौकशीचे आदेश

छळवणूक प्रकरणाची दखल घेत राष्ट्रपतींनी दिले चौकशीचे आदेश
वादग्रस्त पोलीस अधिकारी सागर एकोस्कर यांच्या चौकशीचे आदेश
Sagar EkoskarDainik Gomantak

मडगाव : वादग्रस्त पोलीस अधिकारी सागर एकोस्कर यांच्याकडून मडगाव येथील फ्लोयड कुतीन्हो यांची झालेल्या कथित छळवणूक प्रकरणाची मुख्य सचिवांनी चौकशी करावी असा आदेश राष्ट्रपती कार्यालयातून जारी झाला आहे.या संदर्भात कुतीन्हो यांनी राष्ट्रपतीकडे तक्रार केली होती. यावरुन त्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.(Controversial police officer Sagar Ekoskar's interrogation)

Sagar Ekoskar
गोव्याची भक्ती भारतीय बुद्धिबळ ऑलिंपियाड संघात

यामध्ये मायणा कुडतरी पोलीस स्थानकाचे तत्कालीन पोलीस निरीक्षक सागर एकोस्कर,उपनिरीक्षक तेजसकुमार नाईक व अन्य पोलिसांनी आपल्यावर खोटा गुन्हा नोंद करून आपल्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न केल्याचे म्हटले होते. याबाबत राष्ट्रपती कार्यालयाने 22 मार्च रोजी मुख्य सचिवांना पाठविलेल्या पत्रात या प्रकरणाची सखोल चौकशी करावी असे म्हटले आहे.

Sagar Ekoskar
गोवा पर्यटनासाठी मुख्यमंत्र्यांचे एक पाऊल पुढे! आता सर्व माहिती मिळणार एका क्लिकवर

या तक्रारीची केंद्रीय गृह मंत्रालयानेही दखल घेताना राज्याच्या गृह सचिवांना या तक्रारीची प्रत पाठविताना या प्रकरणाची चौकशी करावी असे म्हटले आहे. आपल्यावर खोटा गुन्हा दाखल करून पोलीस आपल्या चारित्र्यावर चिखलफेक करू पाहत असल्याचा आरोपही कुतीन्हो यांनी आपल्या तक्रारीत केला आहे. कुतीन्हो हे सध्या लंडन मध्ये असून पोलिसांनी इथे त्यांच्या विरुद्ध लूक आऊट नोटीस जारी करून तिची प्रत कुतीन्हो यांच्या घराच्या दरवाजावर चिकटवली होती.

आपल्याला बदनाम करण्याचा हा प्रयत्न असे त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. त्यामूळे या प्रकरणाच्या अंती सत्य काय असणार यावरुन सर्वांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. कारण या निकालावरुन फ्लोयड कुतीन्हो व पोलीस अधिकारी सागर एकोस्कर ही दोन मोठी नावे या प्रकरणाशी जोडली गेली आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.