कुंकळ्ळी पालिकेत खडाजंगी

पोलिसांचा हस्तक्षेप : अपशब्दामुळे नगराध्यक्ष-नगरसेवकांत जुंपली
Controversial situation in Cuncolim Municipality
Controversial situation in Cuncolim Municipality Dainik Gomantak

कुंकळ्ळी: कुंकळ्ळी (Cuncolim) नगरपालिका (Municipality) बैठकीत प्रश्न विचारणाऱ्या नगरसेवकाला (Corporator) नगराध्यक्ष लक्ष्मण नाईक यांनी ‘भुंकणारा कुत्रा’ असे संबोधल्यामुळे नगरसेवक उदेश देसाई यांनी बैठकीत गोंधळ घालून या अपशब्दाचा नगराध्यक्ष नाईक यांना जाब विचारला. नगरसेवक देसाई यांनीही नगराध्यक्षांना तसाच अपशब्द वापरल्याने नाईक व देसाई यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. प्रकरण हातघाईवर येते असे दिसताच उपस्थित पोलिसांनी हस्तक्षेप करून नगरसेवक उदेश देसाई यांना बाजूला काढले.

Controversial situation in Cuncolim Municipality
Goa आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात उद्या ठरणार 75 क्रिएटिव्ह माईन्ड्स!

नगराध्यक्षांनी नगरसेवकाला अपशब्द वापरल्यामुळे अन्य नगरसेवक राहुल देसाई यांनी नगराध्यक्ष लक्ष्मण नाईक यांच्याकडून माफी मागताना पालिका बैठकीत आवाज उठविला. नगराध्यक्षांनी आपले शब्द मागे घ्यावे व नगरसेवकाची माफी मागावी अन्यथा येणाऱ्या पालिका बैठकीवर बहिष्कार घालण्याचा इशारा राहुल देसाई यांनी दिला.

कुंकळ्ळी पालिकेची एक विशेष बैठक बोलावून सदर बैठक आयत्यावेळी रद्द केल्याप्रकरणी उदेश देसाई यांनी जाब विचारला असता, हा प्रकार घडला. या विशेष बैठकीत नगरसेवक उदेश देसाई यांनी तत्कालीन मुख्याधिकारी वायलेट गोम्स यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी खास बैठक बोलावण्याची मागणी केली होती; मात्र अनुमोदन नसल्यामुळे ती खास बैठक रद्द करण्यात आली होती.

उदेश देसाई व नगराध्यक्ष लक्ष्मण नाईक यांच्यात प्रत्येक विषयावरून वाद झाला. संतापलेल्या नगराध्यक्षांनी नगरसेवक उदेश यांना बैठकीतून बाहेर हाकलण्याचा इशारा दिला. मात्र, उदेश यांच्यावर काहीच परिणाम झाला नाही. संतप्त उदेश देसाई यांनी नगराध्यक्षाच्या खुर्चीकडे धाव घेत नगरपालिका नियम पुस्तक रागाने नगराध्यक्षाच्या टेबलावर आपटले. प्रकरण हातघाईवर येते असे दिसल्यावर पोलिसांनी व मुख्याधिकारी जुवांव यांनी हस्तक्षेप केल्यामुळे अनर्थ टळला.

दरम्यान, पालिका बैठकीत उदेश देसाई यांनी विविध प्रकरणे बाहेर काढून नगराध्यक्षांना धारेवर धरले. उदेश यांनी आपल्याला बैठकीत नालायक नगराध्यक्ष संबोधून नगराच्या प्रथम नागरिकाचा अपमान केल्याचा आरोप नगराध्यक्ष नाईक यांनी केला. नियमबाह्य वागल्यामुळे आपण तसे शब्द वापरले, असे नगराध्यक्ष म्हणाले.

विकासकामांना मान्यता

बैठकीत विविध विकासकामांना मान्यता देण्यात आली. कुंकळ्ळी पालिकेच्या नव्या व्यावसायिक इमारतीचे विद्युतीकरण करणे, नवीन जनरेटर खरेदी, नवीन शववाहिका खरेदी करणे व कचरा गोळा करण्यासाठी चार कामगार नेमण्याचा या बैठकीत निर्णय घेण्यात आला. संपूर्ण बैठक उदेश व नगराध्यक्ष यांच्यात झालेल्या शाब्दिक चकमकीमुळे गाजली. विशेष म्हणजे विरोधी गटातील राहुल देसाई व सत्ताधारी गटातील उदेश देसाई सोडून एकही नगरसेवकाने बैठकीत तोंड उघडले नाही.

प्लास्टिक बंदीचा पुन्हा ठराव

एक वेळा वापरण्यात येत असलेल्या प्लास्टिकवर बंदी घालण्याचा ठराव पालिका बैठकीत संमत करण्यात आला. मात्र, नगरसेवक या महत्त्वाच्या विषयावर गंभीर दिसलेच नाहीत. सरकारने प्लास्टिक कारखाने बंद करावे, लोक मासे कसे आणणार, प्लास्टिक बंदी शक्य आहे का? अशी चर्चा नगरसेवक करताना दिसले. कुंकळ्ळी नगरपालिका प्लास्टिक बंदीचे नाटक करीत आहे. यापूर्वी असाच ठराव घेण्यात आला होता; मात्र अंमलबजावणी झाली नाही, असे लोकांचे म्हणणे आहे.

Controversial situation in Cuncolim Municipality
गोव्याच्या किनाऱ्यावरील अवैध कृत्यांवर आळा घाला

मर्जीतील कर्मचाऱ्यांना केले जाते कायम

कुंकळ्ळी पालिकेत जे कामगार कचरा उचलतात त्यांना कायम न करता जे राजकीय वरदहस्त घेऊन कचरा गोळा करणारे कामगार म्हणून कार्यालयात काम करतात त्याच कर्मचाऱ्यांना कायम केले जात असल्याचा आरोप उदेश देसाई यांनी केला. गुरांच्या कोंडवाड्यासाठी नेमलेला कर्मचारी गुरे पकडायची सोडून ट्रेंड लायसेन्स देण्याचे काम करीत असल्याचेही यावेळी उघड झाले.

अबब... ६८ लाखांची शेड!

कुंकळ्ळी पालिकेने कचरा यार्डात एक लहानशी पत्र्याची शेड उभारली असून, ही साधी शेड उभारण्यात पालिकेने ६८ लाख खर्च केल्याचे ऐकून नगरसेवकांनी तोंडात बोटे घातली.

पालिकेपुढे आर्थिक संकट

कुंकळ्ळी नगरपालिकेने कचरा प्रकल्पाजवळ व कुंकळ्ळी बाजारात जी जमीन संपादित केली होती, त्या जमीन मालकांपैकी एकाला साडेतीन कोटी रुपये तर दुसऱ्याला सत्तर लाख रुपये अतिरिक्त देण्याचे फर्मान उच्च न्यायालयाने दिले आहेत. सध्या पालिकेच्या तिजोरीत खडखडाहट असल्याने हा निधी कसा भरावा या संकटावर पालिका बैठकीत चर्चा करण्यात आली. जी जमीन उपयोगात नाही ती विकून निधी द्यावा अथवा सरकारकडून मदत मागावी, अशा सूचना नगरसेवकांनी केल्या

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com