मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व आरोग्यमंत्री विश्वजित राणेंच्या वादाची चर्चा सर्वत्र

The controversy between Goa CM Pramod Sawant and Health Minister Vishwajit Rane is being discussed everywhere
The controversy between Goa CM Pramod Sawant and Health Minister Vishwajit Rane is being discussed everywhere

पणजी: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत(cm PRAMOD SAWANT) आणि आरोग्यमंत्री विश्वजित राणे(Health Minister Vishavajit Rane) यांच्यात काल उफाळून आलेला वाद मिटविण्यात भाजपला तूर्त यश आले आहे. मुख्यमंत्री यांच्या शासकीय निवासस्थानी काल रात्री मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, भाजपचे प्रदेशाध्यक्ष(BJP) सदानंद शेट तानावडे(Sadanand Sheth Tanavade), संघटन सचिव सतीश धोंड यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत या दोन्ही नेत्यांमधील वाद मिटवण्यात आलेला आहे. दोघांनीही एकमेकाच्या विरोधात जाहीर वक्तव्य करू नयेत, अशी समज  बैठकीत पक्ष संघटनेकडून देण्यात आली आहे. यामुळे मुख्यमंत्री व आरोग्यमंत्री आणि या पुढे समन्वयाने काम करण्याचे ठरवले आहे. जर काही मतभेद झाले तर ते आधी पक्ष संघटनेकडे मांडण्यात येणार आहेत, त्यावर जाहीर भाष्य करण्यात येणार नाही, असे या बैठकीत ठरविण्यात आले आहे.(The controversy between Goa CM Pramod Sawant and Health Minister Vishwajit Rane is being discussed everywhere)

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्यातील वादाची चर्चा सार्वत्रिक झाल्यानंतर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी त्याची दखल घेतली आहे. वैयक्तिक हेवेदावे बाजूला ठेऊन समन्वयाने काम करण्याचा सल्ला पक्ष नेतृत्वाने दिला आहे. यासाठी काल मध्यरात्रीपूर्वी बैठकीचे आयोजनही करण्यात आले होते. मुख्यमंत्र्यांनी आरोग्य खात्याचे काम स्वतंत्रपणे पाहणे कालपासून सुरु केले आहे. आजही त्यांनी फोंडा व मडगाव येथे भेट देऊन आपण आरोग्य खात्यात लक्ष घालणे सुरु केल्याचे दाखवून दिले आहे. मुख्यमंत्र्यांना कोणीतरी चुकीची माहिती दिल्याने त्यांचा गैरव्यवस्थापन असल्याबाबत गैरसमज झाला असावा असे आरोग्यमंत्र्यांचे काल म्हणणे होते, मात्र मुख्यमंत्र्यांनी त्याला जाहीर उत्तर देणे टाळले आहे. 

या दोन्ही नेत्यांतील वाद आता आटोक्यात आणण्याची गरज आहे हेही भाजपच्या नेत्याना कळून चुकले आहे. काल रात्री उशिरा बैठक झाली. व्हिडिओ कॉन्फरन्स पद्धतीच्या या बैठकीत मुख्यमंत्री व तानावडे यांच्यासह संघटन सचिव सतीश धोंड, राज्य प्रभारी सी. टी. रवी, राष्ट्रीय संघटन  सचिव बी. एल. संतोष हेही सहभागी झाले होते. या बैठकीतही वाद उफाळून येऊ देऊ नका, समन्वयाने काम करा,असा सल्लावजा आदेश दिला गेला असल्याची माहिती  मिळाली आहे.
 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com