गोवा कॉग्रेस बैठकीदरम्यान का झाली धक्काबुक्की?

गोवा कॉग्रेस बैठकीदरम्यान का झाली धक्काबुक्की?
Goa Congress

मडगाव:  गोव्याचे(Goa)प्रभारी दिनेश राव(Dinesh Rao) यांनी गुरुवारी दुपारपासून जिल्हास्तरीय काँग्रेस(Congress) पदाधिकाऱ्यांना भेटून चर्चा सुरू केली. वास्तविक या बैठकीला केवळ महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांनाच बोलाविण्यात आले होते, तरी सुद्धा उस्मान खान या जिल्हा समितीच्या सदस्याने या बैठकीबद्दल आपल्याला का सांगितले नाही, असा सवाल करीत बैठकीच्या ठिकाणी हंगामा केला.(The controversy erupted yesterday during the Goa Congress meeting)

ही बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ असलेल्या हॉटेलमध्ये झाली होती. हंगाम्यानंतर अखेर खान यांची समजूत घालून त्याला बाजूला काढण्यात आले. उस्मान खान हा काँग्रेसच्या जिल्हा कार्यकारिणीवर कार्यकारी सदस्य म्हणून नियुक्त असून काँग्रेस पक्षात आता अल्पसंख्याकांना विश्वासात घेतले जात नाही असा आरोप त्यांनी केला. जिल्हा समितीचे अध्यक्ष ज्यो डायस यांच्याकडे त्यांनी काहीवेळ वादही घातला.

या बैठकीत जिल्हा समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सरचिटणीस आणि खजिनदार अशा महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांनाच बोलविण्यात आले होते. त्यामुळे खान याना या बैठकीची कल्पना देण्याचा कुठलाही प्रश्न नव्हता अशी माहिती एका पदाधिकाऱ्याने दिली. या बैठकीत व्यत्यय आणण्यासाठी त्याला कुणीतरी मुद्दामहून येथे पाठविले असावे असा आरोप केला. 

जेव्हा संकल्प आमोणकर भांबावतात...
त्यानंतर तेथे संघटनात्मक बाबींवर थोडीशी चर्चा करून ते परत फिरताना तेथे उत्तर गोवा जिल्हाध्यक्ष विजय भिके पोहोचले. त्याआधी तेथे उत्तर गोव्यातील गटाध्यक्ष राव यांच्या भेटीची प्रतीक्षा करत बसले होते. त्यांना भेटीसाठी सव्वाचार वाजताची वेळ देण्यात आली होती. मात्र संकल्प आमोणकर यांना साडेतीन वाजताच राव यांच्या भेटीसाठी घेऊन गेले. त्यांना काय विषय मांडला जाणार हे माहीत नव्हते. आमोणकर यांनी तोंड उघडण्याआधीच राव यांनी त्यांना जाब विचारण्यास सुरुवात केल्याने ते भांबावले. त्यातील काही जण कक्षाबाहेर येऊन बसले. तेवढ्यात उत्तर गोवा जिल्हाध्यक्ष विजय भिके तिथे आले होते.

का झाली धक्काबुक्की?
संकल्प आमोणकर व सहकारी बाहेर येताच भिके यांनी त्यांना उत्तर गोव्यातील गटाध्यक्षांना आत भेटीसाठी बोलावले का याची विचारणा केली. त्यावर आमोणकर त्यांच्या अंगावर धावून गेले. भिके यांनीही प्रत्युत्तर देण्याची तयारी केली. यावेळी त्या कक्षाबाहेर एकच गोंधळ झाला. थोडी धक्काबुक्कीही झाली. 

त्यानंतर माध्यम विभागाचे अध्यक्ष अमरनाथ पणजीकर व त्यांचे सहकारी, युवक काँग्रेसचे अध्यक्ष ॲड. वरद म्हार्दोळकर व सहकारी, महिला काँग्रेसच्या अध्यक्ष बीना नाईक व त्यांच्या सहकारी, काँग्रेस सेवादलाचे शंकर किर्लपालकर व त्यांचे सहकारी, तसेच प्रदेश समितीच्या पदाधिकाऱ्यांशी राव यांनी संघटनात्मक बाबींवर चर्चा केली. 

यावेळीही अनेकांनी प्रदेशाध्यक्षपदी कोण असावा, असे सुचवण्याचा प्रयत्न केला. काहींनी आताच उमेदवारी जाहीर केली तर मतदार संपर्कासाठी उत्तम होईल, असे सांगितले. मात्र राव यांनी वारंवार कोणते मुद्दे काँग्रेसने हाती घेतले पाहिजेत व संघटना मजबूत करण्यासाठी काय केले पाहिजे याची विचारणा केली.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com